Ankita Walawalkar : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची चौथी रनर अप होण्याचा बहुमान अंकिता वालावलकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ला मिळाला. घराबाहेर आल्यावर तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. पहिल्या दिवसापासून अंकिता ‘टीम-बी’चा महत्त्वाचा सदस्य होती. त्यामुळे सूरजच्या विजयावर देखील तिने आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय अंकिता सध्या एका वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ने ( Ankita Walawalkar ) ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं देखील तिने घरात सांगितलं होतं. आता ग्रँड फिनालेनंतर अंकिताला सर्वत्र तिच्या लग्नाबद्दल विचारलं जात आहे. तिचे काही चाहते सोशल मीडियावर मेसेज करून देखील तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल विचारपूस करत आहे. कोकण हार्टेड गर्लने अशीच एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अंकिताशी यापुढे मैत्री होणार नाही” घराबाहेर आल्यावर अभिजीतचं मोठं वक्तव्य! म्हणाला, “निक्की माझी…”

अंकिताच्या पोस्टने वेधलं लक्ष

“तुझा घो ( नवरा ) कोण आहे आता सांग ना… झालं आता बिग बॉस, मी खरंच जाणून घेण्यासाठी उत्साही आहे.” चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना अंकिताने ‘कोकण हार्डेट बॉय’चा चेहरा केव्हा दाखवणार याची तारीख जाहीर केली आहे. अंकिताने ‘१२ ऑक्टोबर’ असा रिप्लाय चाहत्याला दिला आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने घड्याळाची वेळ दर्शवणारा इमोजी देखील शेअर केला आहे. यामुळे १२ ऑक्टोबरला अंकिता ( Ankita Walawalkar ) होणाऱ्या नवऱ्याविषयी खुलासा करणार हे स्पष्ट झालं आहे.

अंकिताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत, “आता लवकरच तुम्हाला कोकण हार्टेड बॉय कोण आहे हे समजेल. तसेच फेब्रुवारीच्या आधी लग्न आणि होणाऱ्या नवऱ्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. मी कोकणात लग्न करेन आणि नंतर मुंबईला रिसेप्शन देईन” असं सांगितलं आहे.

हेही वाचा : “भावा एकदम झापुक झुपूक…”, Bigg Boss ने घराबाहेर काढलेल्या आर्याची सूरजसाठी पहिली पोस्ट! ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Ankita Walawalkar
अंकिता वालावलकरने जाहीर केली तारीख ( Ankita Walawalkar )

दरम्यान, अंकिताचं ( Ankita Walawalkar ) विजेतेपद थोडक्यात हुकलं असलं तरीही सध्या प्रेक्षक आणि तिचे चाहते या कोकण हार्टेड गर्लवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.