Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्यात विविध ट्विस्ट येतात. यंदा ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री कंगना रणौत व अभिनेता श्रेयस तळपदेने ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर खास उपस्थिती लावली आहे.

रितेश देशमुखने मोठ्या उत्साहात या दोघांचं स्वागत केलं. “श्रेयस आणि कंगना यांची जोडी भाऊच्या धक्क्यावर येणार… मग कल्ला तर जोरदार होणार” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यावेळी कंगना तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना देत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…”

कंगना व श्रेयस येताच घरातील सदस्यांना काही हटके टास्क देण्यात आले होते. फुग्यातील हवा इन्हेल करून स्पर्धकांना कार्डवर लिहिलेला संदेश म्हणून दाखवायचा होता. यावेळी अभिजीतला त्याचं आयकॉनिक ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं गायला सांगितलं होतं. तर, निक्की तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील “बाईईई…” हा डायलॉग म्हणून दाखवत होती. फुग्यातील हवा घेऊन हे डायलॉग म्हणून दाखवल्यामुळे सदस्यांचा आवाज नेहमीपेक्षा काहीसा वेगळा येत होता. त्यांचे वेगळे आवाज ऐकून घरात एकच हास्यकल्लोळ झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : अभिजीत सावंतने रॅपिड फायर खेळताना दिली जबरदस्त उत्तरं, म्हणाला, “‘बी’ टीममधून आर्याला बाहेर काढून…”

“राम राम मंडळी…” म्हणत भाऊच्या धक्क्यावर कंगनाची एन्ट्री

कंगना यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर एन्ट्री घेताच “राम राम मंडळी…” म्हटलं. मराठी भाषेतून संवाद साधत नमस्कार केल्याने कंगना यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय आज या ( Bigg Boss Marathi ) शोमध्ये ‘कलर्स मराठी’वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘दुर्गा’ मालिकेची टीम सुद्धा उपस्थित राहणार आहे.

kangana ranaut
कंगना रणौत यांचा चित्रपट ( kangana ranaut )
View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदाच्या आठवड्यात इरिना, वैभव चव्हाण, आर्या जाधव व अभिजीत सावंत हे सदस्य घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता भाऊच्या धक्क्यावर जोरदार कल्ला करून झाल्यावर यांच्यापैकी कोण घराचा ( Bigg Boss Marathi ) निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.