Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस ‘मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या अंतिम आठवडा सुरू आहे. या अंतिम आठवड्यात देखील घरातील सदस्यांमधील समीकरणं बदललेली पाहायला मिळत आहेत. जे चांगले मित्र आहेत, त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. अभिजीत आणि अंकितामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे सतत दोघं भांडताना दिसत आहेत. तसंच निक्की आणि जान्हवी आता एकमेकींबरोबर चांगल्या बोलताना पाहायला मिळत आहेत. अवघ्या काही दिवसांवर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ठेऊन ठेपला आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे घरात असलेल्या सात सदस्यांपैकी कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच सूरज आणि निक्कीने चक्क ट्रॉफीची पैज लावली आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…

‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर सूरज आणि निक्कीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूरज निक्कीला अरबाजवरून चिडवताना दिसत आहे. याच गप्पांच्या शेवटी दोघं ट्रॉफीची पैज लावतात. व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज निक्कीला म्हणतो, “मला काय सांगायचं नाही. तुझ्या मूडनुसार तू त्याच्या गळ्यात पडणार.” निक्की म्हणते की, मी तुझ्याकडे येईन. त्यावर सूरज म्हणतो, “तू माझ्याकडे येऊच शकत नाही.” तेव्हा निक्की म्हणते की, मी तुझ्याकडे माझ्या पायाने चालत येईन.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर आणि मेघा धाडेची धमाल-मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुमची मैत्री…”

सूरज आणि निक्कीमधली पैज ( फोटो सौजन्य - कलर्स मराठी )
सूरज आणि निक्कीमधली पैज ( फोटो सौजन्य – कलर्स मराठी )

पुढे सूरज म्हणतो, “तुझा मूड आल्यावर तू त्याच्या गळ्यात पडणार. माझं पिलू आलंय किती दिवसांनी…बाहेर गेलं आणि परत मला भेटलंच नाही.” यावर निक्की हसत म्हणते, “तुला वेड लागलंय?” तेव्हा सूरज म्हणतो, “तू असंच करणार आहेस. मला वेड नाही लागलंय.” निक्की म्हणते की, काहीही…मी तुला म्हणेन, आता तरी बोल. त्यावर सूरज म्हणाला, “मी का बोलू?” निक्की म्हणाली की, “ते मला माहित नाही. तुला बोलावं लागेल.”

त्यानंतर सूरज म्हणाला, “तुला त्याची सारखी आठवण येते. तुझ्या डोक्यात सारखे त्याचे विचार असतात.” यावर निक्की म्हणते, “तो माझ्या डोक्यातून गेला.” तेव्हा सूरज म्हणाला की, नाही गेला…तू डोक्यातून काढलं असशील तर जाईल ना. पण तू डोक्यातच ठेवलं आहेस…तू म्हणतेस मी त्याला डोक्यातून काढलंय. पण तिथून जाणार नाही. निक्की म्हणते, “मी तिथून काढलंय” सूरज म्हणतो, “तिथून जाणार नाही. तू आता असं बोलतेय. पण त्यावेळेस तो म्हणाला की, निक्की सॉरी. तर तू लगेच माफ करून गळ्यात पडणार मला माहितीये. बाईईईई…मला माहितीये तू कसली बाई आहेस” निक्की म्हणते, “असं काही नाही. तुझा गैरसमज आहे हा.” यानंतर सूरज आणि निक्कीमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीची पैज लागते.

हेही वाचा – Video: “एवढी २० वर्ष तुम्ही जे अभिजीतला प्रेम दिलंय ते आताही द्या”, अभिजीत सावंतच्या सासूबाईचं वक्तव्य, म्हणाल्या…

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Cine Marathi (@cinemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात लवकरच मिडवीक एलिमिनेशन होणार आहे. एकाबाजूला अंकिता वालावलकर घराबाहेर गेल्याचं म्हटलं जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला वर्षा उसगांवकर एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे. पण नेमकं कोण घराबाहेर झालं आहे? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.