Bigg Boss Marathi Season 5 Winner Prize Money : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा सीझन प्रेक्षकांचा लवकर निरोप घेणार असल्याची चर्चा होती. अखेर ‘बिग बॉस’च्या टीमने यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा करत यंदाचा सीझन केवळ १० आठवडे सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. हा सीझन फक्त ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे सध्या हा शो संपायला शेवटचा फक्त दीड आठवडा बाकी राहिला आहे. सीझन अंतिम टप्प्यात आल्याने आज घरात एक महत्त्वाचा टास्क पार पडणार आहे. या टास्कची माहिती देताना ‘बिग बॉस’कडून यंदाच्या विजेत्याला काय बक्षीस मिळणार हे देखील जाहीर करण्यात आलं. मात्र, बक्षिसाची रक्कम जिंकण्यासाठी सगळ्या स्पर्धकांना या ‘महाचक्रव्युह टास्क’चा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – माहेरच्या गणपतीसाठी खास अट! अंकिताने लग्नाला होकार देण्याआधी होणाऱ्या नवऱ्याला विचारलेला ‘हा’ प्रश्न; वाचा किस्सा

Bigg Boss Marathi : घरात होणार ‘महाचक्रव्युह’ टास्क

‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून एकूण २५ लाख रुपये मिळणार आहेत. पण, यात एक मोठा ट्विस्ट आहे. बक्षिसाची ही रक्कम जिंकण्यासाठी सदस्यांना घरात महाचक्रव्युह टास्क खेळावा लागणार आहे. बिग बॉस सांगतात, “या सीझनच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम आहे २५ लाख रुपये. ही रक्कम कमावण्यासाठी मी आणलाय या सीझनमधील सर्व टास्कचा बाप…महाचक्रव्युह!”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

महाचक्रव्युह टास्कमध्ये विविध टप्प्यावर वेगवेगळी रक्कम लिहून ठेवल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता घरातील ८ सदस्य हा टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, यावरच यंदाचा विजेता सदस्य बक्षीसाची रक्कम म्हणून नेमके किती लाख जिंकणार हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : निक्कीची टीम ‘मालक’! ‘हे’ ४ सदस्य झाले ‘सांगकामे’, वर्षा यांचे पाय दाबले, तेल लावलं अन्…; जान्हवीला अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घरातील सदस्यांनी हा ‘महाचक्रव्युह’चा टास्क व्यवस्थित पूर्ण केला तरच विजेत्या स्पर्धकाला २५ लाख मिळतील अन्यथा बक्षिसाची रक्कम केली जाईल. त्यामुळे पाचव्या सीझनच्या विजेत्याला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार हे या टास्कनंतर स्पष्ट होईल.