Bigg Boss Marathi 5 Top 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होईल, हे दोन दिवसांनी कळेल. रविवारी ६ ऑक्टोबर रोजी पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. गुरुवारच्या एपिसोडमध्ये वर्षा उसगांवकर एलिमिनेट झाल्या आणि बिग बॉसमधील टॉप ६ सदस्यांची नावं समोर आली. आता या शोमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे.

Bigg Boss Marathi Top 6: अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर हे बिग बॉसमधील सहा फायनलिस्ट आहेत. यांच्यापैकी एक जण आज घराबाहेर जाणार, असं प्रोमोवरून दिसतंय. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोत घरातील सदस्यांना गार्डन एरियात उभं करून बिग बॉस शोमधील ट्विस्टबद्दल सांगतात.

हेही वाचा – “तुमची WonderGirl शोमधून निरोप घेतेय, पण…”, घराबाहेर आल्यावर वर्षा उसगांवकरांची पहिली पोस्ट! म्हणाल्या, “या प्रवासात…”

“बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप ६ फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येतो आहे ट्विस्ट. आता आपल्याला कळेल टॉप ५” अशी घोषणा बिग बॉस करतात. ही घोषणा ऐकून सदस्यांना धक्का बसतो, असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : अभिजीत सावंत ठरला ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा Finalist! ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारे टॉप-६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ६७ दिवसांनी वर्षा उसगांवकर Eliminate! एक्झिट घेताना म्हणाल्या, “या घरात अपमान तोंडावर पचवायला…”

हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक आज कोण घराबाहेर जाणार, याबाबत अंदाज व्यक्त करत आहेत. त्यापैकी खूप जणांना वाटतंय की आज जान्हवी घराबाहेर जाणार. ‘जान्हवीला बाहेर काढा’, ‘बिग बॉस जरा तरी लाज असेल तर जान्हवीला बाहेर काढा,’ ‘एवढं वाईट खेळून तिला फिनालेमध्ये नेलंय तुम्ही, ओव्हरअॅक्टिंगची दुकान जान्हवी बाहेर जायला हवी,’ ‘जान्हवी फिनाले डिझर्व्ह करत नाही, प्रत्येकवेळी ओव्हरअॅक्टिंग,’ अशा कमेंट्स यावर प्रेक्षकांनी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
bigg boss marathi top 5 video viral
व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, आजच्या एव्हिक्शननंतर बिग बॉसला टॉप ५ सदस्य मिळतील. हे पाच सदस्य ग्रँड फिनालेत पोहोचतील आणि त्यापैकी एक विजेता होईल. आज कोण घराबाहेर जाणार आणि कोण विजेत्याच्या ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ जाणार, हे लवकरच कळेल. या शोचा ग्रँड फिनाले रविवारी ६ ऑक्टोबर रोजी होईल.