Bigg Boss Marathi Season 5 Finale : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. या सीझनमधल्या प्रत्येक सदस्याची घराघरांत चर्चा सुरू आहे. यंदाच्या सीझनला टीआरपी देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंग जबाबदारी सांभाळली आहे. घरात सतत भांडणाऱ्या निक्की- जान्हवी, अरबाजची ताकद, अभिजीतचा खेळ, सूरजचा साधेपणा, डीपी-अंकिताची मैत्री या सगळ्या गोष्टींबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’ची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली असतानाच, हा शो शंभर दिवस पूर्ण होण्याआधी बंद होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं कारण, म्हणजे घरात नुकतीच पार पडलेली पत्रकार परिषद. ‘बिग बॉस’चा हिंदी सीझन असो वा मराठी प्रत्येक सीझनला अंतिम फेरीला एक ते दोन आठवडे बाकी राहिलेले असताना घरात पत्रकार परिषद पार पडते. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कमेंट्स सेक्शनमध्ये ‘बिग बॉस’ ७० दिवसांमध्ये संपणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी देखील शो लवकर संपणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi – निक्कीशी शोसाठी नातं आहे का? अरबाजने थेट सांगितलं ‘नाही’; स्पष्ट उत्तर देत म्हणाला, “बाहेर गेल्यावर आम्ही…”

तृप्ती देसाईंची पोस्ट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या तृप्ती देसाईंनी यासंदर्भात पोस्ट सेअर करत आपलं मत मांडलं आहे. “यंदाचा ‘बिग बॉस’चा गाजणारा सीझन ७० दिवसांतच गुंडाळणार आहेत. असं ऐकलं खरं आहे का? फिनाले लवकर करायचा आहे म्हणून संग्रामला पद्धतशीर सन्मानाने नियमानुसार बाहेर काढलं. आमची गायत्री दातार हात फ्रॅक्चर झाला तरी घरात होतीच की, गेमपण खेळत होती…तसेच संग्रामने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन काहीच केले नाही. आतापर्यंतची फेल वाइल्ड कार्ड एन्ट्री.” असं मत त्यांनी पोस्ट शेअर करत मांडलं आहे. तसेच या पोस्टमध्ये तृप्ती यांनी ‘कलर्स मराठी’ आणि ‘बिग बॉस’ला टॅग देखील केलं आहं.

हेही वाचा : १४ दिवसांत घराबाहेर आलेल्या संग्राम चौगुलेची पहिली पोस्ट! Bigg Boss Marathi च्या प्रवासाबद्दल म्हणाला…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : तृप्ती देसाईंची पोस्ट

हेही वाचा : भाऊचा धक्का नव्हे तर…; या आठवड्यात रितेश देशमुख घेणार नाही सदस्यांची शाळा, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : तृप्ती देसाईंची पोस्ट

दरम्यान, आता शो ( Bigg Boss Marathi ) खरंच ७० दिवसांमध्ये संपणार की, मेकर्स ऐनवेळी प्रेक्षकांसमोर एक नवीन ट्विस्ट आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.