Bigg Boss Fame Sana Makbul Liver Cirrhosis : ‘बिग बॉस ओटीटी ३’ची विजेती आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सना मकबूलचा काही दिसांपुर्वी एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ती रुग्णालयात दाखल असल्याचे दिसून आले होते. सनाच्या एका मैत्रिणीने तिचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी सनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतु तेव्हा सनाने तिच्याबद्दल काही माहिती दिली नव्हती. अशातच आता एका मुलाखतीत सनाने सांगितले की, तिला लिव्हर सिरोसिस सारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.

सना मकबूल गेल्या काही काळापासून ऑटोइम्यून हेपेटायटीसने ग्रस्त

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली, “मी गेल्या काही काळापासून ऑटोइम्यून हेपेटायटीसने ग्रस्त आहे, पण परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. माझी रोगप्रतिकारक शक्ती यकृतावर परिणाम करु लागली आणि आता मला लिव्हर सिरोसिसचे निदान झाले आहे. या कठीण काळात मी खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता माझी इम्युनोथेरपी सुरू झाली आहे आणि मी माझ्या बरं होण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.”

सना मकबूलचे यकृत प्रत्यारोपण टाळण्यासाठी प्रयत्न

यापुढे ती म्हणाली, “डॉक्टर आणि मी यकृत प्रत्यारोपण टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. मी इम्युनोथेरपी सुरू केली आहे आणि हे खूप थकवणारं आहे. मला फक्त यकृत प्रत्यारोपणासारख्या मोठ्या गोष्टीची आवश्यकता पडू नये हीच माझी इच्छा आहे. मी इतक्या सहजपणे हार मानण्यास तयार नाही. उपचार हा एक प्रवास आहे आणि मी यात जशी जशी पुढे जात आहे, तशी मी शिकत आहे.”

सना मकबूलने आजारपणामुळे कामातून घेतला ब्रेक

यानंतर सना म्हणाली, “मी गेल्या अनेक काळापासून या आजाराचा सामना करत आहे. पण आता हा आजार खूप वाढला आहे. यामुळे मी माझ्या कामातूनही ब्रेक घेतला आहे. आता सगळं व्यवस्थित सुरू असताना माझं आरोग्य चांगलं नाही. यासाठी मला वाईट वाटत आहे. या आजाराने माझ्यावर भावनिक परिणाम केला आहे. पण मी स्वतःला सांगत राहते की, हा फक्त एक टप्पा आहे. मला आता जास्त काळजी घ्यावी लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सना मकबूलच्या मैत्रीणीने पोस्ट शेअर करत दिलेली माहिती

दरम्यान, ८ जून रोजी सना तिच्या कुटुंबाबरोबर बकरी ईद साजरी करत होती, तेव्हा तिची तब्येत अचानक बिघडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. हॉस्पिटलमधून तिची डॉक्टर मैत्रीण आशना कांचवालाने तिचा फोटो शेअर करत लिहिले होते की, सना गंभीर आजाराशी झुंजत आहे आणि तिला चाहत्यांच्या प्रार्थनांची गरज आहे.