‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघं एक पाऊल दूर राहिला. त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र घर केलं. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारही शिव ठाकरेचे कौतुक करताना दिसत आहेत. शिव ठाकरेने नुकतंच त्याच्या वडिलांना एक वचन दिले आहे.
शिव ठाकरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आणि त्याचे वडील हसताना दिसत आहे. शिव ठाकरेचे वडील मनोहरराव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “वीणा जगताप हा विषय संपलाय” शिव ठाकरेची आई स्पष्ट शब्दात म्हणाली “तिने लग्नाचा…”
“माझ्या कूल वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिस्टर. मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणुजी ठाकरे. आज मी वचन देतो की, एक वडील म्हणून तुम्हाला कायमच माझा अभिमान वाटेल”, असे शिव ठाकरे म्हणाला.

आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला
दरम्यान बिग बॉसमुळे शिव ठाकरे घराघरात पोहोचला. शिव ठाकरे हे नाव आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा अनेक कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला.
बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.