‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आणि आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. आज मुग्धाचा वाढदिवस आहेत. मुग्धाने आज २४व्या वर्षांत पदार्पण केलं आहे. त्यानिमित्ताने तिला कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.

मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायनने खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बालपणीचे फोटो शेअर करून मृदुलाने मुग्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरचं लग्न मोडण्यासाठी सावनीने रचला नवा डाव, कोळी कुटुंबाशी संबंधित असलेल्या ‘या’ व्यक्तीची घेतली मदत

तसेच मृदुलाचा नवरा विश्वजीत जोगळेकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुग्धाचा मजेशीर फोटो शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मेव्हणी.” यावर मुग्धा जिजाजीचे आभार मानतं म्हणाली, “अरे काय फोटो आहे हा जीज…थँक्यू.”

हेही वाचा – शशांक केतकरने सध्याच्या राजकारणावर मांडलं परखड मत, शरद पवार व अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुग्धाची मोठी बहीण मृदुलाचं गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच लग्न झालं होतं. अलिबागचे प्रसिद्ध जोगळेकर फार्मचे विश्वजीत जोगळेकरशी मृदुला लग्नबंधनात अडकली. त्यानंतर २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश लघाटेचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता.