Aditi Sharma Blessed with Baby Girl: ‘कथा अनकही’ फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माने आनंदाची बातमी दिली आहे. अदिती दुसऱ्यांदा आई झाली आहे. अदिती शर्मा व सरवर आहुजा या सेलिब्रिटी जोडप्याचे कुटुंब पूर्ण झाले आहे. आदितीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. ही गुड न्यूज तिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली.

अदिती आणि सरवर यांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर १० वर्षांनी अदिती दुसऱ्यांदा आई झाली. अदिती व सरवर यांना सरताज आहुजा नावाचा मुलगा आहे. आता त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. मुलीच्या आगमनाने त्यांचे पूर्ण झाले आहे. अदिती शर्माने आज (२५ नोव्हेंबर) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. प्रिय बेबी गर्ल, तू या जगात आली आहेस, तुझ्या येण्याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो. तुझ्यासाठी आम्ही खूप प्रार्थना केल्या होत्या. तुला आम्ही देवाकडे मागितलं होतं, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

अभिषेक बच्चनच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळेना; I Want To Talk सिनेमाचे ३ दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’

आदितीने पुढे लिहिलं, ‘ती या जगात आली आहे आणि ती खूप सुंदर आहे. आमच्या बाहुलीचा मोहक सुगंध, छोटे पाय, छोटी नाजूक बोटं आणि चमकणारे डोळे यामुळे आमच्या आयुष्यात आनंदाला पारावार उरलेला नाही. आमचे पुढचे आयुष्य खूप आनंदी असेल. देवाने आम्हाला जगातील सर्वात सुंदर भेट दिली आहे.’

सुपरहिट चित्रपट दिले अन् मुंबई सोडून ‘इथे’ निघून गेला आमिर खानचा भाऊ; आता करतोय ‘हे’ काम, म्हणाला…

अदितीने ही पोस्ट केल्यावर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. श्रद्धा आर्या, शक्ती अरोरा, नेहा सक्सेना, करणवीर ग्रोव्हर, जया भट्टाचार्य, पुरु छिब्बर यांनी कमेंट्स करून अदिती व सरवरचं अभिनंदन केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
 Aditi Sharma blessed with baby girl
अदिती शर्मा, तिचा पती अभिनेता सरवर आहुजा व त्यांचा मुलगा (फोटो- इन्स्टाग्राम)

अदिती व सरवर यांचे करिअर

अदिती शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘कथा अनकही’, ‘गंगा’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’, ‘सात उचक्के’, ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘अंग्रेज’, ‘कलीरें’, ‘इक्को मिक्के’ या चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सरवर आहुजा हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘पुनर्विवाह’, ‘खन्ना अँड अय्यर’, ‘केशव पंडित’, ‘पटियाला ड्रीम्झ’, ‘गंगा’, ‘मेरे पापा हिरो हिरालाल’, ‘कुछ खट्टा कुछ मीठा’, ‘मेरी पडोसन’ या सारख्या चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय.