scorecardresearch

“कियारा डुप्लिकेट विकी कौशल मात्र…” श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष

या चित्रपटात विकी बरोबर कियारा अडवाणी, पेडणेकर या अभिनेत्रीदेखील आहेत

“कियारा डुप्लिकेट विकी कौशल मात्र…” श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे.

श्रेया सोशल मीडियावर ती कायमच सक्रीय असते. या कार्यक्रमात नुकतीच विकी कौशलने हजेरी लावली होती. श्रेयाने विकी बरोबरच डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती असं म्हणाली ‘कियारा डुप्लिकेट असली तरी विकी कौशल खरा आहे,’ अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी भाऊ कदम आणि तिने धमाकेदार स्किट्स सदर केले आहेत.

“चित्रपटाचा सेट किंवा…” कंगनाबरोबरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत

विकी ‘गोविंदा नाम मेरा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमबरोबर आला होता. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले असून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने याची निर्मिती केली आहे.

दरम्यान झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. याच कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे ही प्रसिद्धीझोतात आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 19:00 IST

संबंधित बातम्या