अभिनेता कुशल बद्रिके हा गेली अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच भरभरून कौतुक होते. विनोदवीर म्हणून ओळखला जाणाऱ्या कुशलचा नुकताच रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. नुकतच महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झालं. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पहिल्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली. या पहिल्या पावसावर कुशलने रोमँटिक अंदाजात खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कुशलने पोस्टमध्ये लिहिलं आहे. “आता पहिल्या पावसात भिजायला जात नाही मी, कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा. मात्र मनमोकळा श्वास घेतो भिजल्या मातीचा… तुझ्या केसांसारखा….(सुकुन)”. या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याला पहिल्या पावसावर कविता करण्याची विनंतीही केली आहे.
कुशल त्याच्या बायको सुनयनावर जीवापाड प्रेम करतो काही दिवासंपूर्वीच कुशलने बायकोच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली होती. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथक डान्सर आहे. सध्या ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी अमेरिकेत गेली होती. त्यामुळे अभिनेत्याने बायकोच्या आठवणीत खास पोस्ट शेअर केली होती.