Chala Hawa Yeu Dya fame Kushal Badrike shares video: अभिनेता कुशल बद्रिके हा जितका त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो, तितकाच त्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओंमुळेदेखील चर्चेत असतो. काही गंभीर तर काही मजेशीर व्हिडीओ तो शेअर करताना दिसतो.
नुकताच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये कुशल विजू माने यांच्यासह बाहेर जेवणासाठी गेल्याचे दिसतेय. त्याच्यापुढे शेवपूरी आहे. तिथेच एक महिला नृत्य सादर करताना दिसत आहे. कुशल हे नृत्य पाहत असताना विजू माने यांनी हा व्हिडीओ शूटिंग केला आहे. कुशलला याची जाणीव झाल्यानंतर तो हसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कुशल बद्रिकेने शेअर केला व्हिडीओ
आता कुशलच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्याबरोबरच विजू माने आणि कुशल बद्रिकेच्या पत्नीने केलेल्या कमेंट्स लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे.
कुशल बद्रिकेच्या पत्नीने सुनयना बद्रिकेने लिहिले की नृत्याची फारच आवड दिसतेय. शेवपुरी खाऊन झाली की घरी या. मी नृत्य शिकवते. तिच्या या कमेंटवर अनेकांनी त्याला चांगले नृत्य शिकव, शेवपुरी महागात पडणार अशा अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

तर विजू माने यांनी कुशल बद्रिकेच्या व्हिडीओवर कमेंट करीत अभिनेत्याच्या पत्नीला टॅग केले आणि लिहिले की बघ आणि बघून घे. त्यावर सुनयना यांनी लिहिले की, म्हणजे माझा काय तसा आक्षेप नाही. पण, मी बघितलही नाही तिथे मी बघूच शकत नाही. कुशलची पत्नी सुनयना ही उत्तम कथ्थक डान्सर आहे. कुशल अनेकदा त्याबद्दल बोलल्याचे पाहायला मिळाले आहे.

कुशल बद्रिकेच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात काम करताना दिसत आहे. चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मात्र, यावेळी कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे असल्याचे दिसत आहे. भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे व गौरव मोरे या पाच कलाकारांच्या वेगवेगळ्या टीम आहेत. महाराष्ट्रातील अनेक कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आता ‘चला हवा येऊ द्या’चे हे नवीन स्वरूप प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.