Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugde Shared emotonal Post On Mother’s Birthday : श्रेया बुगडे सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वामधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा यामधून तिच्या विनोदी शैलीद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. श्रेया अभिनयासह सोशल मीडियावरही सक्रिय असते. अशातच तिनं नुकतीच तिच्या आईसाठी खास पोस्ट केली आहे.

श्रेया बुगडे अनेकदा सोशल मीडियावर कुटुबीयांबद्दल पोस्ट करीत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. आता तिच्या आई नूतन बुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तिनं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे. श्रेयानं आईबरोबरचे काही खास फोटो पोस्ट केले असून, त्यांना छान कॅप्शनही दिली आहे.

या पोस्टमधून ती आईबद्दल म्हणाली, “आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू मला आयुष्य हसत-खेळत, कुठलीही मर्यादा न ठेवता आणि उद्दिष्टानं कसं जगायचं हे शिकवलंस. तुझ्याकडून मला प्रेरणा मिळते. तू कायम मला पाठिंबा देतेस. तू मला मिळालेला एक आशीर्वाद आहेस. तुझं प्रेम मला कठीण दिवसाला सामोरं जाण्यास मदत करतं. तू कुटुंबाचा खंबीर आधार आहेस. तुझ्याबरोबरचा प्रत्येक दिवस खूप खास आहे. तुझी मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.”

श्रेयानं यावेळी तिच्या आईबरोबरचे, तसेच वडिलांबरोबरचेही काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आठवणींना उजाळा दिला आहे. श्रेयाच्या या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनीही कमेंट करीत तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेया सध्या ‘झी मराठी’वरील’ चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वात झळकत असून, त्यामधून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या कार्यक्रमात मराठीतील लोकप्रिय कलाकारांची फौज असल्याचं पाहायला मिळतं. श्रेया सेटवरील अनेक गमतीजमती, तसेच पडद्यामागील किस्से सोशल मीडियामार्फत चाहत्यांसह शेअर करीत असते.

दरम्यान, श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं अनेक मालिका व चित्रपटांत काम केलं आहे. गेली अनेक वर्षं ती ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून पाहायला मिळत होती. तिच्या विनोदी शैलीसाठी अनेकांकडून तिचं कौतुक होताना दिसतं.