दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक मराठी कलाकारांच्या घरातही दिपावली आणि लक्ष्मीपूजन अगदी थाटामाटात पार पडले. नुकतंच चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल याने लक्ष्मीपुजनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

तुषार देवल हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो लक्ष्मीपूजनानिमित्त पूजा करताना दिसत आहे. यानंतर तो त्याची पत्नी अभिनेत्री स्वाती देवलचीही पूजा करताना दिसत आहे. यावेळी तो तिला ओवाळून नमस्कारही करतो.
आणखी वाचा : “कंदील निवडणं काय सोप्पं काम नसतं गड्या”; हेमांगी कवीने शेअर केली दिवाळीची आठवण, म्हणाली…

या व्हिडीओला कॅप्शन देताना तुषारने “गृहलक्ष्मीच पूजन पण आवश्यक आहे…”, असे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.

दरम्यान तुषार देवलची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्वाती देवल ही माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. तिने कलाविश्वामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

आणखी वाचा : Video : देशमुखांची दिवाळी! जिनिलीयाने उटणं लावून दोन्ही मुलांना घातलं अभ्यंगस्नान, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तर तुषार देवल याचीही लोकप्रियता तितकीच आहे. कधी एखाद्या प्रसंगाला योग्य संगीत देत, तर कधी आगरी भाषेमध्ये हटके बोलत तो प्रेक्षकांची मन जिंकतो.