मराठीत सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप बॉलीवूडसह इतर सिनेसृष्टीत उमटवली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री छाया कदम. आपल्या दमदार अभिनयाने छाया कदम यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. हे वर्ष छाया कदम यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं आहे. कारण नामांकित अशा पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांचा गौरव होतं आहे. काही महिन्यांपूर्वी ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये छाया कदम यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine as Light) पुरस्कार मिळाला.

पायल कपाडिया दिग्दर्शित या चित्रपटात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. म्हणूनच ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आपल्या आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून गेलेल्या छाया कदम ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता छाया यांचा ‘लापता लेडीज’ चित्रपट ९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून निवडण्यात आला आहे. त्यामुळे सध्या छाया कदम यांचं कौतुक होतं आहे.

हेही वाचा – Video: “या दोघांच्या स्वभावामुळे माझी झोप उडाली…”, कुशल बद्रिकेने बायको अन् मुलाचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाला, “यावर उपाय…”

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटात छाया कदम यांनी मंजू माईची भूमिका साकारली होती. अगदी फणसासारखी स्वभाव असलेली मंजू माई पाहायला मिळाली. बाहेरून जरी कडक आणि परखड बोलणारी असलेली तरी तिचा आतून मृद स्वभावाची होती. छाया कदम यांनी ही मंजू माई उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळे त्यांचं भरभरून कौतुक झालं. आता ही मंजू माई ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचली आहे. ‘लापता लेडीत’ ऑस्करला गेल्यानिमित्ताने मंजू माई म्हणजेच छाया कदम यांनी सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

मंजू माईचा फोटो आणि ‘लापता लेडीज’चा पोस्टर शेअर करत छाया कदम यांनी लिहिलं आहे, “…आणि तुमची मंजू माई ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचली. अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असतं की, आपली कला ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचावी. पण त्यासाठी त्या कलाकाराच्या वाट्याला तसं पात्र ही यावं लागतं. मला आनंद आहे की, माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या माध्यमातून मंजू माई हे पात्र आले आणि आज तुम्हा सर्वांच्या प्रेमाने तुमची मंजू माई ‘ऑस्कर’पर्यंत पोहोचली. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या व मंजू माईबरोबर राहो.”

हेही वाचा – Video: “मी या लोकांसमोर झुकणार नाही”, अरबाज घराबाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळीचा निर्धार, म्हणाली, “माझं साम्राज्य…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, छाया कदम यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री ईशा केसकर, शिवानी सोनार, मयुरी देशमुख, ऋतुजा बागवे, रवी जाधव, अश्विनी कासार या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.