‘सीआयडी’ फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री त्यांनी ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लिव्हर डॅमेज झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात १ डिसेंबरपासून उपचार चालू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताची ‘सीआयडी’ फेम दयानंद शेट्टीने पुष्टी केली आहे.

दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. ते ‘सीआयडी’ या क्राइम शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स ही भूमिका साकारून खूप लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील त्यांच्या शेवटच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांची शेवटची पोस्ट २ आठवडे जुनी आहे. त्यांनी नातीबरोबरचा फोटो शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

‘सीआयडी’ फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मृत्यूशी झुंज अपयशी

दिनेश फडणीस यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या नातीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांनी गणपती व गौरीच्या आगमनाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. तसेच सीआयडीच्या टीमने रियुनियन केलं, त्याचे फोटोही त्यांच्या अकाउंटवर पाहायला मिळतात.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज दौलत नगर स्मशानभूमीत दिनेश फडणीस यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांचा मित्र दयानंद शेट्टी याने दिली आहे.