Devmanus Fame Ekta Dangar Shared A Video : कलाकारांना मालिका, चित्रपटसृष्टीत किंवा इतर कुठल्याही कलाकृतीत काम मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. फार कमी कलाकार असे असतात, जे याला अपवाद ठरतात. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीनेही तिच्या टीव्हीवर दिसण्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे.
‘झी मराठीवरील’ ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे एकता डांगर. एकताने त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. त्यामध्ये ती गंगा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
‘एकताने नुकताच इन्स्टाग्रामवर त्यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती एका घरात ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू असतानाचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला तिने “स्वप्न पाहण्यापासून तर ते सतत्यात उतरवण्यापर्यंत. दुसऱ्याच्या घरात स्वत:ला टीव्हीवर पाहणं माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे.” अशी कॅप्शन दिली आहे.’
एकता सध्या ‘देवमाणूस’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, ती अनेकदा मालिकेच्या सेटवरील गमतीजमती, तसेच पडद्यामागील सीनदरम्यानचे व्हिडीओ शेअर करीत असते. नुकताच तिने मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्याबरोबर सीनसाठी रीहर्सल करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
एकता यापूर्वीसुद्धा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत असताना तिचे सहकलाकार अभिनेत्री तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अमृता रावराणे यांच्याबरोबरच्या रील शेअर करयाची. एकूणच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामार्फत ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून, तिने शेअर केलेल्या रील व व्हिडीओंना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.
दरम्यान, एकताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने मराठीसह गुजराती भाषेतही काम केले आहे. तिने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत, तसेच ‘राम भरोसे’, ‘वेलकम जिंदगी’, यांसारख्या चित्रपटांतही काम केले आहे. एकताला रंगभूमीचीही पार्श्वभूमी आहे. तिने काही नाटकांतही काम केले आहे.