Devmanus Fame Kiran Gaikwad’s Wife Actress Vaishnavi Kalyankar Shared A Post : किरण गायकवाड मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘झी मराठी’वरील ‘देवमाणूस’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्या या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता किरणची बायको अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
वैष्णवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून त्याला खास कॅप्शन दिलं आहे. तिच्या या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. वैष्णवीने यावेळी तिचा नवरा किरणबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये किरण दाक्षिणात्य लूकमध्ये पाहायला मिळत आहे, तर वैष्णवीनेसुद्धा साडी नेसली असून दोघे एकमेकांसह पोज देताना फोटो काढत असल्याचं या पोस्टमधून दिसतं.
वैष्णवीने या फोटोंना, “मिस्टर अँड मिसेस देवमाणूस असंच ना?” असं हटके कॅप्शन दिलं आहे. तिने हटके कॅप्शन दिलेल्या या पोस्टखाली दोघांच्या चाहत्यांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळतं. यावेळी एका नेटकऱ्याने, “देवमाणूसने बना दी जोडी”, दुसऱ्याने, “तुमची जोडी फार छान आहे”, “नजर ना लागो कोणाची जगदंब”, “डॉ साहेब आणि वहिनी” अशा कमेंट्स केल्या आहेत.

किरण गायकवाड सध्या ‘देवमाणूस’ मालिकेमुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या या मालिकेचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. यापूर्वी ‘देवमाणूस’च्या दोन्ही भागांनासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘देवमाणूस’ या मालिकेतून किरण पहिल्यांदा नायक म्हणून समोर आला.
किरण व वैष्णवी यांनी डिसेंबर २०२४ रोजी लग्न केलं होतं. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनीही हटके पोस्ट करत चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली होती. किरण व वैष्णवी यांनी ‘देवमाणूस’च्या पहिल्या भागात एकत्र कामसुद्धा केलं होतं.
दरम्यान, वैष्णवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर वैष्णवीने ‘देवमाणूस’ मालिकेत काम केल्यानंतर ती ‘झी मराठी’वरीलच ‘तू चाल पुढं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकली होती. या नंतर ती ‘सण मराठी’वरील ‘तीकळी’ मालिकेत मुख्य नायिका म्हणून पाहायला मिळाली.