Dhanashree Verma Responds To Gold Digger Trolling : धनश्री वर्मा आणि क्रिकेटपटू युजवेंद्र चहल हे कायम चर्चेत राहणाऱ्या कपल्सपैकी एक कपल आहेत. घटस्फोटानंतरही दोघांबद्दलच्या चर्चा कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या घटस्फोटाच्या कारणाबाबत लोक अनेक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण युजवेंद्र चहलने धनश्रीला फसवलं असं म्हणतात; तर काही जण धनश्रीला गोल्ड डिगर म्हणतात.
युजवेंद्र चहलपासून विभक्त धनश्री वर्माला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं. अजूनही तिला ट्रोल केलं जातं, मात्र, आता तिने या टीकांकडे सकारात्मकपणे पाहायला शिकलं आहे. अशातच अलीकडेच तिने एका रिअॅलिटी शोमध्ये तिला ‘गोल्ड डिगर’ म्हटलं जाण्याबद्दल खुमासदार प्रतिक्रिया दिली.
धनश्री वर्मा अश्नीर ग्रोव्हरच्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोचा एक प्रोमो भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांना जोड्यांमध्ये विभागून दोन सुटकेस बॅग निवडायला सांगितल्या आहेत. त्यापैकी एक ‘गोल्डन बॅग’ आहे, जी २ लाख रुपयांची आहे, तर दुसरी ‘सिल्वर बॅग’ असून त्यात १ लाख रुपये होते.
या प्रोमोमध्ये धनश्री आणि अभिनेता अर्जुन बिजलानी यांची जोडी पाहायला मिळत आहे. यावेळी बॅगची निवड करताना अर्जुन म्हणातो, “मला डायमंड, सिल्वर काही जमत नाही. मला फक्त गोल्डच शोभतं.” तेव्हा धनश्रीने हसत उत्तर देते की, “ही ओळ मी तर नक्कीच म्हणू शकत नाही. कारण जर मी हे म्हणाले, तर जे प्रेम मिळणार आहे, ते सुद्धा मिळणार नाही.”
दरम्यान, धनश्रीने केलेलं ही वक्तव्य ‘गोल्ड डिगर’ म्हणून केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर आहे. या वक्तव्यातून तिने ट्रोलिंगबद्दल मिश्कील आणि चपखल टिपण्णी केली. दरम्यान, धनश्रीचा हा शो नुकताच ६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
धनश्री अजूनही चहलच्या संपर्कात
फराह खानच्या एका व्ह्लॉगमध्ये धनश्रीने सांगितलं की, ती अजूनही युजवेंद्र चहलबरोबर मेसेजद्वारे संपर्कात आहे. फराहने विचारलं की, ती पहिल्यांदाच एकटी राहत आहे का, त्यावर धनश्री म्हणाली, “आता सगळं स्थिर झालं आहे. मी अजूनही युजीबरोबर मेसेजवर संपर्कात असते. तो मला ‘आई’ म्हणायचा. तो खरंच गोड आहे.”
धनश्री-चहल यांच्याबद्दल थोडक्यात
धनश्री आणि चहल यांची भेट कोविड लॉकडाऊनदरम्यान झाली होती आणि त्यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं. पण हळूहळू त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०२२ च्या मध्यात ते वेगळं राहायला लागले. शेवटी फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. मार्च २०२५ मध्ये त्यांना अधिकृत घटस्फोट मंजूर झाला.