‘कलर्स मराठी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला. या शोमधील १२ स्पर्धकांनी आपल्या नृत्याची कमाल दाखवत प्रेक्षक व परिक्षकांचं मनोरंजन केलं होतं. या शोची विजेती नेहा पाटील ठरली तर उपविजेता शुभम बोराडे हा लावणी कलाकार ठरला होता. बीडचा शुभम बोराडे नागपुरात मोठा झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याचा संघर्ष आणि कठीण प्रसंगाबाबत खुलासा केला.

शुभम बोराडेने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत तो प्रसंगा सांगितला, जेव्हा त्याने स्वतःला फासावर लटकून घेतलं होतं. संघर्ष करत असताना आयुष्यात कठीण प्रसंग आला होता का? असं विचारल्यावर शुभम म्हणाला, “बरीच वर्षे झालीत या गोष्टीला. तेव्हा मी नवीन नवीन लावणीला सुरुवात केली होती. त्यावेळी मुलांनी लावणी करणं हे लोकांना पचत नव्हतं. मुलगा लावणी करताना दिसला, साडी नेसून नाचताना दिसला की लोक तोंडावर हसायचे. आपली आवड म्हणून अनेक जण डान्स करतात. जेव्हा एखादी मुलगी डान्स करते, तिला नाचता येत नसेल तरी तिच्यासाठी टाळ्याच वाजतात. पण एखादा मुलगा जेव्हा डान्स करायला शिकतो किंवा लावणी करतो तेव्हा त्याच्या कपड्यांवरून त्याचे कपडे आणि पूर्ण लूक थोडा विचित्र दिसतो, त्यामुळे लोक त्याला जोकरसारखे वागवतात. माझ्याबरोबर असं खूपदा व्हायचं.”

“आमचे फोटो वधू-वरांसारखे दिसतात”, मन्सूर अली खानचं त्रिशाबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला, “मी काही…”

पुढे शुभम म्हणाला, “माझी आई तेव्हा कुठे गेली की लोक कमेंट्स करायचे, माझ्याबद्दल वाईट बोलायचे. हे सगळं ऐकून माझी आई कधी कधी खूप दुःखी व्हायची, ती रडायची. तिला मी माझ्यासाठी रडताना पाहिलं आहे. त्यावेळी माझं मन खूप तुटलं होतं की लोकांमुळे माझ्या आईला त्रास होतोय. हा विचार आल्यानंतर माझं वय खूप कमी होतं तरीशी मी स्वतःला फाशी लावून घेतली होती. त्यावेळी मी सहावीला असेन. मी लटकलो आणि माझा एक मित्र घरी आला. ‘शुभम आहेस का घरी?’ अशी हाक त्याने मारली. कारण आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. मला पाहिल्यावर खूप रडारडी झाली होती. मी पेरूच्या झाडाला लटकलो होतो, तो तिथे आला आणि त्याने मला वर उचलून धरलं. अशा रितीने मी त्यावेळी वाचलो होतो.”

View this post on Instagram

A post shared by lavni prince Shubham Borade (@shubhuborade)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “खरं तर लोकांमुळे माझ्या मनात हे विचार आले होते आणि मी ते केलं. विचार करा की लोकांचं बोलणं एखाद्याला किती जिव्हारी लागू शकतं, त्यामुळे लोकांनी बोलण्याआधी विचार करायला हवा की आपल्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे, पण ते ऐकणं समोरच्यासाठी खूप कठीण असू शकतं. लोकांच्या बोलण्याने एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा त्याचं काहीही होऊ शकतं.”