नुपूर शिखरे व आयरा खान यांचा रिसेप्शन सोहळा शनिवारी (१३ जानेवारी रोजी) मुंबईत पार पडला. या रिसेप्शन सोहळ्यात बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींपासून अगदी दक्षिणेतील स्टार्स आणि टीव्ही कलाकारही उपस्थित होते. या पार्टीला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील ‘जेठालाल’ म्हणजेच दिलीप जोशीही हजर होते. ते त्यांच्या खऱ्या आयुष्यातील ‘दयाबेन’बरोबर आले होते.

दिलीप जोशी पत्नीसह आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला पोहोचले. यावेळी त्यांनी पोज दिल्या, पण तेव्हाच गर्दीतून त्यांना कुणीतरी ‘बबीताजी’ (शोमध्ये मुनमुन दत्ता साकारत असलेलं पात्र) यांच्याबद्दल विचारलं. त्यावर दिलीप जोशींनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी

‘जेठाजी बबीताजी कुठे आहेत?’ असा प्रश्न त्यांना पापाराझींपैकी एकाने विचारला. त्यावर हसत दिलीप जोशी म्हणाले, ‘त्यांच्या घरी, इतर कुठे’. दिलीप जोशींना हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या पत्नीही हसू लागल्या. दिलीप जोशींनी हसत हसत त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

Video: CM एकनाथ शिंदेंची आयरा खानच्या रिसेप्शनला हजेरी, तर मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीसांच्या लूकने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. आमिर खानने लेकीच्या रिसेप्शनला सर्वांना बोलावलं, यासाठी काहींनी त्याचं कौतुक केलंय. तर काहींनी दिलीप जोशींनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने हसू आवरत नव्हतं.