ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम आई-वडील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण बाळाचा जन्म वेळेआधीच झाला होता त्यामुळे बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं. तब्बल १९ दिवसांनंतर दीपिकाला आणि तिच्या बाळाला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला होता.
हेही वाचा- प्राजक्ता गायकवाडने दिली गुडन्यूज, पदवी परीक्षेत मिळाले इतके गुण
काही दिवसांपूर्वी दीपिका आणि शोएबने त्यांच्या बाळाचं नाव जाहीर केलं होतं. या दोघांनी आपल्या मुलाचं नाव रुहान ठेवलं आहे. आता दोघांनी बाळाबरोबचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. २१ जून २०२३ रोजी दीपिकाने रुहानला जन्म दिला होता. आज त्याच्या जन्माला १ महिना पूर्ण झाला आहे. दरम्यान दीपिका आणि शोएबने बाळाबरोबरचा पहिला फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा-“स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला
फोटो शेअऱ करत दोघांनी कॅपशनमध्ये रुहान असं लिहिलं आहे. फोटोमध्ये शोएबने रुहानला हातात घेतलेलं दिसत आहे. तर दीपिका बाळाला किस करताना दिसत आहे. फोटमध्ये दोघांनी अद्याप बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.
दीपिका कक्करची आठव्या महिन्यातच प्रसूती झाली. प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळ खूप अशक्त होते त्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. सुमारे १९ दिवस एनआयसीयूमध्ये राहिल्यानंतर आता तिच्या मुलालाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. शोएब सध्या ‘अजुनी’ मालिकेमध्ये काम करत आहे. तर दीपिका बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन लांब आहे.