प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. ‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली दीपिका सध्या तिचा गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. दीपिका गेल्या काही काळापासून मनोरंजनविश्वापासून दूर आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर अभिनयाला कायमचा रामराम करणार असल्याचा खुलासा दीपिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

दीपिकाने ‘टेली चक्कर’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रसूतीनंतर गृहिणी व आईचं आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दीपिका म्हणाली, “गरोदरपणाचा काळ मी खूप एन्जॉय करत आहे. आमच्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी आम्ही उत्सुक आहोत. मी बालपणापासून अगदी कमी वयातच अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. जवळपास १०-१५ वर्ष मी सतत काम केलं आहे.”

हेही वाचा>> कुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…

“गरोदरपणातील काळात मी अभिनयाला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला. मला आता काम करायचं नाही, असं मी शोएबला सांगितलं. एक गृहिणी व आईप्रमाणे मला आयुष्य जगायचं आहे,” असंही पुढे दीपिकाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> Video : राखी सावंतचा अवतार पाहून सारा खान घाबरली, जोरात ओरडली अन्…; IIFA अवॉर्ड सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल

दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी २०१८मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पाच वर्षांनी आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांना दिली. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने २०१३ साली तिने पायलट रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.