Dnyada Ramtirthkar Birthday Celebration : लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ज्ञानदा अभिनयासह सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमार्फत सेटवरील अपडेट, गमती-जमती चाहत्यांसह शेअर करत असते.

ज्ञानदाने गुरुवारी (२६ जून) तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त अनेकांनी तिला सोशल मीडियामार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या फॅन्स कल्बने सोशल मीडियावर तिचे रील बनवत पोस्ट केले होते. यासह ज्ञानदाच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील सहकलाकारांनीही तिला सोशल मीडियामार्फत पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या. अशातच काल ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेच्या सेटवरही अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

ज्ञानदाच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर केक आणण्यात आला होता. यावेळी तिने सहकलाकारांसह केक कट करत तिचा वाढदिवस साजरा केला. ज्ञानदा या मालिकेत काव्या हे पात्र साकारत आहे. तिच्यासह यामध्ये मृणाल दुसानिस, विजय आंदलकर, विवेक सांगळे हे कालाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात. हे सर्व कलाकार सेटवर शूटिंग नसताना एकमेकांबरोबरचे अनेक व्हिडीओ, रील सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

ज्ञानदा रामतीर्थकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेआधी ती ‘ठिपक्यांची रागोळी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती. तिच्या या मालिकेलासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये तिने साकारलेली अपूर्वा ही भूमिका खूप गाजली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानदाने ‘शतदा प्रेम करावे’, ‘सख्या रे’, ‘झिंदगी नॉट आऊट’ यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहे. परंतु, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. यासह अभिनेत्री मालिकांव्यतिरिक्त वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही काम करते. लवकरच तिचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.