‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतंच समोर आलं आहे. त्याचे वडील अशोक ग्रोव्हर यांना वयाच्या ६९ व्या वर्षी देवाज्ञा झाल्याचं अश्नीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. अश्नीर आणि त्याची पत्नी माधुरी या दोघांनी त्याच्या वडिलांचा एक हसरा फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे. अशोक ग्रोव्हर हे दिल्लीत चार्टर्ड आकाउंटंट म्हणून काम करायचे. त्यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.

अश्नीरने आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत लिहिलं की, “गुडबाय बाबा, स्वर्गात जाऊन पापाजी, मोठी आई, आजी आजोबा यांची काळजी घ्या.” बऱ्याच लोकांनी अश्नीरच्या या पोस्टवर कॉमेंट करत त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री अमृता रावचा पती आरजे अनमोल याने कॉमेंट करत त्यांना आदरांजली वाहिली.

आणखी वाचा : सलमान आणि शाहरुख लवकरच येणार आमने सामने; बॉलिवूडमध्ये रचला जाणार वेगळाच इतिहास

अनमोल म्हणाला, “अश्नीर भावा ही बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. कोणत्याही मुलासाठी त्यांचा पहिला हीरो हे त्याचे वडील असतात. त्यांना गमावण हे खूप मोठं दुःख आहे. मी आणि अमृता आम्ही दोघेही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर सदैव असेल.” याबरोबरच अश्नीरच्या चाहत्यांनीही या पोस्टवर सांत्वनपर कॉमेंट केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात भारत पेचा माजी सह-संस्थापक आणि उद्योजक अश्नीर ग्रोव्हर शार्क म्हणून सहभागी झालेला नव्हता. अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या पहिल्या पर्वामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. अश्नीर त्याच्या धमाल विनोदबुद्धीमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे लोकप्रिय झाला याबरोबरच त्याचे धमाल मीम्सही प्रचंड व्हायरल झाले होते.