Actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar :’जाने अनजाने हम मिले’ या मालिकेत मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री आयुषी खुराना हिने गुपचूप लग्न उरकलं आहे. २५ वर्षीय आयुषीने ६ डिसेंबर रोजी दिल्लीत अभिनेता व उद्योजक सूरज कक्करशी लग्नगाठ बांधली. आयुषीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

आयुषी व सूरज यांनी लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा केला. सूरज व आयुषी यांनी पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची बातमी लपवून का ठेवली तेही सांगितलं. “आम्ही सहा महिन्यांपासून लग्नाच्या दिवसाचे प्लॅनिंग करत होतो. आम्हाला थेट लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित करायचं होतं. माझ्या लग्नाबाबत फक्त प्रॉडक्शन टीमला माहिती देण्यात आली होती, कारण त्यानुसार शूटिंग शेड्यूल ठरवायचे होते. मी ऑडिशन देतानाच त्यांना सांगितलं होतं की जर मला लग्नासाठी सुट्टी मिळणार असेल तरच मी ही मालिका करेन. सुदैवाने ते यासाठी तयार झाले. त्यांनी शूटिंगचे योग्य नियोजन केले, त्यामुळे मी लग्नासाठी सुट्टी घेऊ शकले,” असं आयुषी म्हणाली.

हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

सेटवर झालेली दोघांची पहिली भेट

सूरज व आयुषी यांची भेट पाच वर्षांपूर्वी शूटिंग सेटवर झाली होती. तिथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. “आम्ही शूटिंगदरम्यान भेटलो आणि डेट करू लागलो. मग आम्ही प्रेमात पडलो. आमच्या प्रेम कहाणीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यांदा माझ्या मूळ गावी, मध्य प्रदेश मधील बुरहानपूर येथे भेटलो होतो,” असं आयुषीने सांगितलं.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

आयुषीने लग्नासाठी फक्त पाच दिवसांची रजा घेतली होती. ती आता मालिकेच्या शूटिंगसाठी मुंबईतील सेटवर परतली आहे. तिला व सूरज दोघांनाही मालिकांचं शूटिंग करायचं असल्याने आताच हनिमूनला जाणार नसल्याचं आयुषीने सांगितलं.

हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुषीचा पती सूरज हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘पिया अलबेला’, ‘संयुक्त’, ‘कवच’, ‘ढाई किलो प्रेम’ आणि ‘लाजवंती’ सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.