scorecardresearch

Premium

“तुला या लूकमध्ये पाहून त्रास झाला”, विशाखा सुभेदारच्या पोस्टवर चाहतीची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या भावना…”

“खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस,” चाहतीच्या या विधानावर विशाखा म्हणाली….

vishakha subhedar reply to fan
चाहतीच्या कमेंटवर विशाखा सुभेदारने काय उत्तर दिलं?

लोकप्रिय मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या ‘मुरांबा’ मालिकेत रागिनी नावाच्या खलनायिकेची भूमिका साकारत आहे. विशाखा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. इतकंच नाही तर ती तिचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकदा ती चाहत्यांच्या कमेंट्सला उत्तरंही देते. सध्या तिच्या पोस्टवरील अशाच एका कमेंटने लक्ष वेधलं आहे.

“हे पटत नाहीये…” निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट मत; म्हणाली, “पूर्वीचा…”

Pooja bhatt birthday special hero Bollywood film industry journey
Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
man kissed baby alligator viral video
तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”
Meet backbone of Isha Ambani brand woman Bhakti Modi is also co founder of beauty products platform Tira
कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?
shashank ketkar worked with karan johar dharma production
शशांक केतकरला मिळाली मोठी संधी! करण जोहरच्या सीरिजमध्ये साकारणार भूमिका; म्हणाला, “त्यांच्या ऑफिसमध्ये…”

विशाखाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने एका कार्यक्रमासाठी लांब सिल्व्हर जॅकेट असलेला ड्रेस घातला होता आणि थोडी वेगळी केसभुषा केली होती. नेहमी पारंपारिक कपड्यांमध्ये आणि साडीमध्ये वावरणाऱ्या विशाखाला या फोटोतील ड्रेसमध्ये पाहिल्यावर एका चाहतीने कमेंट केली.

एका चाहतीने लिहिलं, “मी जे लिहिणार आहे, ते वाचून तू बहुतेक माझा राग करशील पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते म्हणून न राहावून लिहितेय. खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. तू जशी आहेस, तशीच छान आहेस, तू उत्तम अभिनेत्री आहेस, हे तू खूप वेळा सिद्ध केलंय. पण तुला या लूकमध्ये पाहून मनाला त्रास झाला. तू म्हणशील सगळे कौतुक करतायत आणि ही असं का म्हणतेय, पण तुझ्याबद्दल अटॅचमेंट वाटते, त्यामुळे मी लिहिलं तू राग मानू नकोस.”

vishakha subhedar 1
विशाखा सुभेदारने चाहतीला दिलेलं उत्तर

या कमेंटला विशाखा उत्तर देत म्हणाली, “तुमच्या भावना समजू शकते, नसेल आवडलं तुम्हाला.. पण यात वाईट काय दिसतंय? ज्याचा तुम्हाला त्रास झाला.. एका डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाले होते, त्याचे हे कपडे आहेत, कारण त्यांची मागणी तशी होती.”

दरम्यान, या चाहतीने पुन्हा कमेंट केली. “मला तुला नाव ठेवायचं नव्हतं, पण मला कदाचित ते नीट मांडता आलं नाही म्हणून तुझा गैरसमज झाला असेल. माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं असेल तर माफी मागते. पण मी वाईट हेतुने काहीच बोलले नव्हते”. यावर “मला अजिबात वाईट वाटलं नाहीये, खरंच.. मला तुमचं प्रेम समजतं” असं विशाखा म्हणाली.

vishakha subhedar
विशाखा सुभेदारने चाहतीला दिलेलं उत्तर

दरम्यान, अनेकांनी विशाखाच्या या खास लूकचं कौतुक केलं आहे. ‘एक अभिनेत्री म्हणून नेहमीच छान आहात, आपले हाव भाव व बोलकी नजर अफलातून आहे, हाही लूक आवडला सुंदर’ अशा शब्दात एका चाहतीने विशाखाचं कौतुक केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fan did not like vishakha subhedar look check actress reply hrc

First published on: 03-11-2023 at 16:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×