‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका डिझायनरने प्रियंकावर कपडे चोरल्याचा आणि स्टाईल कॉपी केल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असं म्हटलं जातंय. प्रसिद्ध डिझायनर इशिताने दावा केला आहे की प्रियांकाने तिचे ब्रँडेड कपडे चोरले आणि तिची स्टाईलही कॉपी केली.

“बाळाच्या जन्मानंतर तिला आत्महत्या करायची होती, कारण…”; प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

‘एबीपी लाइव्ह’च्या वृत्तानुसार, प्रियंका चहर चौधरीने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टा हँडलवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले काही फोटो शेअर केले होते. यानंतर इशिताने दावा केला होता की हे तिच्या ब्रँडचे कपडे आहेत, जे तिने खास डिझाइन केले होते. यानंतर इशिताने ट्वीट करत प्रियंका चहरवर आरोप केले. पण नंतर मात्र तिने तिचं ट्वीट डिलीट केलं होतं.

परदेशात स्थायिक असलेली फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर इशिताने प्रियंका चहर चौधरीवर एका ट्वीटमध्ये गंभीर आरोप केले होते. “सायकॉटिक पीआर टीम असलेली ऑब्सेस्ड महिला जी इतरांना त्रास देणे थांबवू शकत नाही. ती विषारीपणाची व्याख्या आहे. तिने इतरांना प्रभावित करण्यासाठी बनावट पर्सनॅलिटी तयार केली आहे,” असं इशिताने तिच्या डिलीट केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

ishita
इशिताने डिलीट केलेलं ट्वीट

इशिताने पुढे लिहिले, “तिला वाटतं की माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या क्लोनसारखे कपडे घालून ती माझ्यासारखी बनू शकते. होय, कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. माझे ३० हजार पौंड किमतीचे कपडे तिने चोरले. मी काहीच बोलले नाही.”

इशिताने दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, “तिने कपडे चोरल्यामुळे मी तिला सुनावलं, पण कळत नाहीये की शत्रू नेमकं कोण आहे. त्यावर मी आता भाष्य करणार नाही. मी तिला ब्लॉक केल्यानंतरही ती मला स्टॉक व कॉपी करत असेल तर तिची समस्या आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या परदेशात असल्याने आपण प्रियंका चहर चौधरीविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. पण भारतात परतल्यावर आपण तक्रार देणार असल्याचं इशिताने म्हटलं आहे.