Shark Tank India Season 4 : ‘शार्क टँक इंडिया’ हा भारतातील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोचे आधीचे तीन सीझन खूप गाजले. त्यानंतर आता लवकरच चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चौथ्या सीझनमधील काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच विविध कारणांनी या शोची चर्चा आहे. तिसऱ्या सीझनमधील शार्क दीपिंदर गोयल चौथ्या सीझनचा भाग नसेल. काही नवीन शार्क्सची नावं समोर आली आहेत. अशातच आता एक लोकप्रिय युट्यूबर शोमध्ये त्याच्या ब्रँडसाठी डील मिळवण्यासाठी येणार आहे.

‘शार्क टँक इंडिया सीझन 4’ च्या ताज्या प्रोमोमध्ये, सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर गौरव तनेजा म्हणजेच ​​फ्लाइंग बीस्ट दिसत आहे. गौरव त्याचा स्पोर्ट्स न्यूट्रिशन ब्रँड बीस्ट लाइफसाठी शार्क्सकडून डील मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये गौरव फॉलोअर्सच्या संदर्भात बोलतांना दिसत आहे. मग गौरवला विनीता म्हणते, “तुम्ही एका तासात एक कोटी रुपये कमावता, मग तुम्ही इथे काय करत आहात?” गौरवने शोमध्ये त्याच्या फिटनेस ब्रँडसाठी डील मिळवण्यासाठी आला होता. तो या ब्रँडच्या माध्यमातून हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर व मास गेनर्स असे प्रॉडक्ट्स विकतो.

हेही वाचा – Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी

पाहा व्हिडीओ –

गौरव तनेजाला ‘शार्क टँक इंडिया 4’ त्याच्या व्यवसायासाठी शार्क्सकडून डील मिळाली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्याचे चाहते त्याला शोमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. गौरवचे यूट्यूबवर ९.२७ मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन यशस्वी पर्वांनंतर शार्क टँक इंडिया सीझन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोचा प्रीमियर ६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. शोमध्ये यंदा काही जुने व काही नवीन शार्क दिसणार आहेत. नमिता थापर, अनुपम मित्तल, अमित गुप्ता, विनीता सिंग, रितेश अग्रवाल, पीयूष बन्सल, अझहर इक्बाल, कुणाल बहल आणि वरुण दुआ हे शोच्या चौथ्या पर्वाचे शार्क्स असतील. ‘शार्क टँक इंडिया’चे आधीचे तीन पर्व खूप गाजले, त्यामुळे आता चौथ्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे.