मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर हेमांगीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच हेमांगीने हिंदी मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर आता हेमांगी एका हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर हेमांगी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, तिच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमांगी लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे. हेमांगीने आपल्या इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचा प्रोमोही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले, “महाराष्ट्राला हसवून झालं आता संपूर्ण भारताला हसवायला येतोय.” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

हेमांगीबरोबर कुशल ब्रद्रिकेही झळकणार

‘मॅडनेस मचाऐंगे’ या हिंदी विनोदी कार्यक्रमात हेमांगीबरोबर मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेही झळकणार आहे. येत्या ९ मार्चपासून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. हिंदी कार्यक्रमात भाग घेण्याची हेमांगीची ही पहिलीच वेळ नाही. सध्या हेमांगी ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेत झळकत आहे. तसेच तिने ‘ताली आणि दो गुब्बारे’ या वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

हेही वाचा- रोमँटिक डेट, खास केक अन्…, लग्नाला तीन महिने होताच पियूष रानडेने पत्नी सुरुचीला दिले खास सरप्राइज, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘अवघाचि संसार’, ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘वादळवाट’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकांमधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.