Holi 2024: उत्साह आणि आनंदाने साजरा होणारा होळी हा सण जवळ आला आहे. या वर्षी २४ मार्चला होळी आणि २५ ला रंगपंचमी (धुळवड) साजरी केली जाणार आहे. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण यात उत्साहाने सहभाग घेतात. त्यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील नायिकांनी रंगपंचमीदरम्यान घडलेले त्यांचे किस्से आणि अनुभव शेअर केले आहेत.

रंजक वळणावर येऊन पोहोचलेली मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील अभिनेत्री तितीक्षा तावडेचा लग्नानंतरचा होळी हा पहिलाच सण आहे. त्याचा आनंद व्यक्त करीत ती म्हणाली, “लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे. त्यामुळे उत्सुकता तर आहेच. शूटिंगमधून वेळ काढू शकले, तर नाशिकला जाऊन होळी साजरा करण्याचा विचार आहे. नाशिकला वेगळ्या तारखेला धुळवड साजरी केली जाते.”

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

तितीक्षा पुढे म्हणाली, “तसं मी तितकीशी होळी खेळत नाही कारण- कामामुळे वेळ कमी मिळायचा. त्यामुळे होळी खेळणं कमी होत गेलं. पण जेव्हा मी ठरवून होळी खेळायला जाते, तेव्हा त्वचा आणि केसांना खोबरेल तेल लावून जाते. हे केल्यामुळे रंग लगेच निघतो आणि त्रास कमी होतो. मी नेहेमी नैसर्गिक रंगांनी होळी खेळायचा प्रयत्न करते.”

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेमधील नायिका शिवानी नाईक हिने आपल्या लहाणपणीचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “होळी हा माझा आवडता सण आहे. लहानपणी होळीच्या रात्री मी झोपायचीच नाही. आम्ही सर्व जण गच्चीत फुगे बनवायचो आणि रंगांचे पाणी तयार करायचो. हा सगळा कार्यक्रम आमच्या सोसायटीच्या गच्चीवर चालू असायचा. धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी आई-बाबा नेहमी सांगायचे की, डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत तेल लावून होळी खेळायला जा आणि मला वाटतं की, हा उपाय घरोघरी वापरला जात असावा. कारण-त्यामुळे रंग खेळून आल्यावर फार त्रास होत नाही. सर्वांनी नैसर्गिक रंगांबरोबरच होळी खेळली, तर कोणालाही तितका त्रास होणार नाही.”

झी मराठीवर नुकत्याचंकाही नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. ‘पारू’ मालिकेमधील शरयू सोनावणेने होळी खेळणेच बंद केले. आपला अनुभव सांगताना ती म्हणाली, “लहानपणी जसं मनाला येईल तसे होळी खेळायचो, कुठलेही रंग वापरायचो, कोणत्याही पाण्यात होळी खेळायचो. पण, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून मी होळी खेळणं बंद केलंय. माझ्या घरी माझा एक पाळीव प्राणीआहे. त्याला बघून समजायला लागलं की, प्राण्यांना रंगांचा त्रास होतो. मला माझ्या पेटला त्रास झालेला सहन होणार नाही. त्यामुळे मी होळी खेळणं बंद केलं; पण रंगाचा एक टिळा मी नक्की लावते. मी सर्वांना सांगू इच्छिते की, होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या. त्यांना रंग लावू नका.”