‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची डोक्यावर घेतलं आहे. मग ती मुख्य भूमिका असो किंवा मध्यवर्ती भूमिका असो. प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे. कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
हेही वाचा- ‘असा’ असेल अक्षरा-अधिपतीचा राजेशाही विवाह सोहळा, लग्नात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स समोर, घ्या जाणून
सध्या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांच्या शाही लग्नसोहळ्याची तयारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा दिमाखात पार पडला. दरम्यान एका मुलाखतीत लग्नाअगोदर अधिपतीने होणारी बायको अक्षरासाठी एक हटके उखाणा घेतला आहे. ऋषिकेश म्हणाला, “आईसाहेबांनी उचलला अक्षरा अधिपतीच्या लग्नाचा विडा. १ ऑक्टोबरला बघा लग्नसोहळा आणि पहायला विसरु नका तुला शिकवीन चांगलाच धडा “ॉ
अक्षरा आणि अधिपती यांच्या लग्नाचं शूटिंग सध्या कर्जतच्या एन. डी स्टुडिओमध्ये सुरु आहे. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा हा स्टुडिओ आहे. या लग्न सोहळ्यासाठी एन. डी स्टुडिओतील रॉयल पॅलेस बुक करण्यात आला आहे. अधिपतीने अक्षरासाठी घेतलेला हा उखाणा आता त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तर या मालिकेच्या आगामी भागांबद्दल सर्वजण उत्सुकता व्यक्त करत आहेत.