Indrayani Serial : चित्रपट, मालिका आणि नाटकांत आपल्याला विविध प्रसंग पाहायला मिळतात. यातील काही प्रसंग मनाला आनंद देणारे आणि खळखळून हसवणारे असतात, तर काही प्रसंग काळजाचा थरकाप उडवणारेदेखील असतात. एखाद्यावर जीवघेणा हल्ला किंवा अपघात यामध्ये शरीराला गंभीर जखमा झालेल्या दिसतात. हे दृष्य पाहून आपलं मनसुद्धा कळवळतं आणि वेदना होतात. मात्र, असे सीन शूट करताना पडद्यामागील कलाकारांची खरी कसरत असते. काही दिवसांपूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेत छोट्या इंदूच्या हाताला मोठी दुखापत झाली होती. तिला झालेला त्रास पाहून सर्व चाहत्यांना वाईट वाटले. मात्र, इंदूचा हा सीन शूट करण्यासाठी पडद्यामागे नेमकं काय घडलं, त्याचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या मालिकेत छोटी इंदू प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. इंदूचा अभिनय प्रेक्षकांना आवडल्याने तिचा चाहता वर्गदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मालिकेत इंदू प्रत्येकाचा जीव की प्राण आहे. अशात काही दिवसांपूर्वी दिवाळीमध्ये फटाके फोडताना इंदूचा हात भाजला होता. सुशिलाची मुलगी करिश्माने इंद्रायणीचा हात भाजावा यासाठी प्लॅन केला होता. इंदूचा हात भाजल्यानंतरदेखील सुशिला तिलाच ओरडत होती. इतकंच नाही तर, ती इंदूला मारण्यासाठी तिच्या अंगावरदेखील धावून आली होती.

हेही वाचा : माझ्या माणसांचा हात धरून…”, रेश्मा शिंदेने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांनी नवऱ्याबद्दल विचारले प्रश्न

सुशिला इंदूला मारण्यासाठी पुढे आली तेव्हा इंदूचे सर्व मित्र, नारायणी ताई आणि गोपाळ तिला मागे खेचतात आणि सुशिलाच्या तावडीतून वाचवतात. यावेळी गोपाळ, “तुम्ही इंदूपासून लांब रहा.”, असं सांगतो. तसेच इंदूचा हात तुमची मुलगी करिश्मामुळे भाजला आहे, असं सर्व मुलं बोलू लागातत.

करिश्मामुळे इंदूच्या हातावर थेट दिवाळीचं रॉकेट उडालं होतं. हातावर रॉकेट आल्याने इंदू यात जास्त जखमी झाली होती. तिच्या हाताची स्किन फाटली होती आणि रक्तस्त्राव होत होता. यावेळी हा सीन शूट करण्यासाठी पडद्यामागच्या कलाकारांनी मोठी मेहनत घेतली. त्याचाच व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे, एक मेकअप आर्टिस्ट इंदूच्या हातावर मेकअप करत आहे. भाजलेली त्वचा जशी दिसते अगदी तसेच हुबेहूब त्याने इंदूच्या हाताला केले आहे. लाल, काळा रंग हातावर लावून मेकअप आर्टिस्टने इंदूचा हात रंगवला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, “पडद्यावर वाटणाऱ्या खऱ्या गोष्टींची, पडद्यामागील रिअल हिरोची कला”, असं लिहिलं आहे.”

पडद्यामागील रिअल हिरोची कला पाहून नेटकऱ्यांनी त्याचं विशेष कौतुक केलं आहे. धिरज पाटील असं या मेकअप आर्टिस्टचं नाव आहे. त्यानेही या व्हिडीओच्या कमेंटमध्ये इंदूचे आभार मानले आहेत. “धन्यवाद ताई, माझ्या कामाची पोचपावती मिळाली मला, खूप खूप मोठी हो”, असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मालिकेत आनंदीबाईंना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यांना काही करून सत्तेत यायचं आहे. सत्ता हातात आली की, सर्वत्र आपलं वर्चस्व असणार असा त्यांचा समज आहे. मालिकेत आनंदीबाई नेहमी इंदूला ओरडताना दिसतात. आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मालिकेत काही दिवसांपूर्वी हरहुन्नरी अभिनेत्री मुक्ता बर्वेची एन्ट्री झाली. मालिकेत मुक्ता मॅडम आनंदीबाईंना प्रत्येकवेळी त्यांची जागा दाखवून देतात.

हेही वाचा : किती वर्षांची झाली ‘चंद्रा’? ‘ढेर सारा प्यार’ म्हणत पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इंद्रायणी’ मालिकेत सध्या मुलांची सहामाही परीक्षा सुरू आहे. अशात मुक्ता मॅडमने या परीक्षेमध्ये आनंदीबाईंनादेखील नागरिकशास्त्र विषयाचा पेपर देण्यास सांगितले आहे. पेपरमध्ये जराही कॉपी केली तर आमदारकीचं तिकीट रद्द होणार, असं मालिकेत कालच्या भागात पाहायला मिळालं.