Jasmin Bhasin Reacts To Troll : अभिनेत्री जास्मीन भसीनने नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. जास्मीनने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं गाणं गाताना दिसत आहे. जास्मीनने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. परंतु, यामध्ये एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं आहे. जास्मीननेही ट्रोल करणाऱ्याला कमेंट करत उत्तर दिलं आहे.

जास्मीन भसीनचा येत्या २८ जूनला वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती आशा भोसले व किशोर कुमार यांचं ‘इंताहा हो गई इंतेजार की’ हे गाणं गाताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या या व्हिडीओला “मूड, कारण वाढदिवसासाठी फक्त १० दिवस बाकी आहेत”, असं कॅप्शन दिलं आहे.

जास्मीनने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने ‘जास्मीनने ओठांवर इंजेक्शन घेतलं आहे’ अशी कमेंट केली आहे. व्हिडीओखाली कमेंट केलेल्या नेटकऱ्याला जास्मीननेही उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “इंजेक्शन नाही फिल्टर आहे.” जास्मीनने हा व्हिडीओ काल बुधवारी १८ जून रोजी शेअर केला होता. आता अभिनेत्रीच्या वाढदिवसाला ९ दिवस बाकी आहेत. जास्मीन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती सोशल मीडियामार्फत तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.

जास्मीन भसीनने शेअर केलेल्या व्हिडीओखालील कमेंट (फोटो सौजन्य, फ्री प्रेस जरनल)

जास्मीन अभिनेता अली गोनीला डेट करत आहे. तर काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या. अली गोनीची मैत्रीण व त्याची सहकलाकार कृष्णा मुखर्जीने ही जोडी यावर्षी लग्न करणार आहे. असं सांगितल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, जास्मीनने या अफवा नाकारल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टेली चक्कर’शी संवाद साधताना जास्मीन म्हणाली होती, “या अफवा ऐकून आम्ही हसत आहोत. खरंच असं काहीही नाहीये, जेव्हा कधी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेऊ तेव्हा आम्ही तो तुम्हाला सांगू; पण तोपर्यंत कुठल्याही अफवा पसरवू नका. सध्या आम्ही फक्त आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. जास्मीन सध्या करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या कार्यक्रमात झळकत आहे.