scorecardresearch

“टोकाचं पाऊल उचलण्याआधी…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर काम्या पंजाबीची पोस्ट

अभिनेत्री काम्या पंजाबीनेही ट्वीट करताना नैराश्य किंवा ब्रेकअपमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुण पिढीबाबत चिंता व्यक्त केली आहे

“टोकाचं पाऊल उचलण्याआधी…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर काम्या पंजाबीची पोस्ट
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरली आहे. अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने ‘अलिबाबा’ मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्येच गळफास घेतला. तुनिषाने कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर १५ दिवसांनी आत्महत्या केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिझानला पहिला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. तुनिषाच्या निधनानंतर तिचा मित्रपरिवार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपलं दुःख व्यक्त करताना दिसत आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री काम्या पंजाबीने केलेलं ट्वीट चर्चेत आहे.

तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल तिच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. यातच अभिनेत्री काम्या पंजाबीनेही एक ट्वीट केलं आहे. ज्यात तिने नैराश्य किंवा ब्रेकअपमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुण पिढीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर काम्या पंजाबीने केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

आणखी वाचा-श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे विचलीत झाल्याने तुनिषापासून विभक्त झालो, शिझान खानचा दावा

काम्याने पंजाबीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “आजकालच्या पिढीला हे काय झालं आहे? तुमच्या समस्याचा सामना करण्यासाठी थोडी तरी हिंमत दाखवा. तुम्ही एवढ्या सहजपणे आयुष्य कसं काय संपवता, लगेचच हार का मानता? एवढं टोकाचं पाऊल उचलण्याआधी किमान तुमच्या आई-वडिलांचा एकदा तरी विचार करा. थोडं महत्त्व त्यांनाही द्या कारण जेव्हा तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलता तेव्हा त्यांना मृत्यूपेक्षाही बरंच काही सहन करावं लागतं.”

दरम्यान तुनिषा शर्माने ‘अलिबाबा’ शोच्या सेटवरच मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. सहकलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर आलेल्या डिप्रेशनमध्ये तुनिषाने हे पाऊल उचलल्याचं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. तुनिषाने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. तसेच ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिकाही तिने साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या