गेल्या दोन ते तीन महिन्यांत बहुतांश मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. शिवानी-अजिंक्य, तितीक्षा-सिद्धार्थ, पूजा सावंत, प्रथमेश परब, योगिता-सौरभ या कलाकारांनंतर आता आणखी एक अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

‘कन्यादान’, ‘वैजू नंबर १’ या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. चेतनने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. थाटामाटात साखरपुडा उरकत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे.

हेही वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, समोर आला पहिला फोटो

चेतनच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. वनिता खरात, संग्राम साळवी यांसारख्या कलाकारांनी त्याच्या साखरपुड्यातील Inside फोटो शेअर करत अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने व त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुड्यात पारंपरिक लूक केल्याचं व्हायरल फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये चेतन त्याच्या होणाऱ्या पत्नीला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचं पाहायला मिळालं. शिवानी सोनार, अभिषेक गावकर, निखिल राजेशिर्के यांसारख्या अनेक कलाकारमंडळींच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.