मराठी मनोरंजविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता बनेला ओळखले जाते. कन्यादान या मालिकेतून अमृता घराघऱांत पोहचली. या मालिकेत ती वृंदा हे पात्र साकारत आहे. लवकरच अमृता व अभिनेता शुभंकर एकबोटे लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

दरम्यान लग्नाअगोदर नुकतीच अमृताची Bride To Be पार्टी पार पडली. अमृताच्या जवळच्या मित्र-मैत्रीणींनी तिच्यासाठी या पार्टीचे आयोजन केले होते. अमृताने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोबरोबर अमृताने एक पोस्टही शेअर केली आहे. अमृताने लिहिले ” मी बंधनात अडकत असले तरी आम्ही एकमेकांना भेटण्याचे, योजना बनवण्याचे, चिडवण्याचे, आणखी आठवणी निर्माण करण्याचे आणि बरेच काही करण्याचे वचन दिले.”

अमृताची ही Bride To Be पार्टी एका निसर्गरम्य ठिकाणी पार पडली आहे. या पार्टीसाठी अमृताने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तसेच भिंतीवर फुग्यांनी डेकोरेशनही करण्यात आले होते. अमृताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- “मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमृताचा होणारा नवरा शुभंकरसुद्धा अभिनेता आहे. कन्यादान मालिकेत त्याने राणा हे पात्र साकारले होते. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. हळूहळू त्यांच्या मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात. आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.