करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात, तसेच डेटवर जातानाही ते पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. त्यांचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असतात. अशातच त्यांचा एक खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो खासगी व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इन्स्टंट बॉलिवूड’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही पार्टी करताना दिसत आहेत, तसेच ते डान्स करत आहेत. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे डान्स मूव्ह पाहून नेटकरी संतापले आहेत. ‘याला रोमँटिक डान्स म्हणत नाहीत, तर अश्लीलता म्हणतात,’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan kundra tejaswi prakash romantic dance video viral hrc
First published on: 14-04-2023 at 17:20 IST