‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेतील मुख्य अभिनेत्री झनक शर्माने साखरपुडा उरकला आहे. झनक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याबद्दल चाहत्यांना सांगितलं. तिने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली झनक लवकरच लग्न करणार आहे. झनकची आई सुप्रिया शुक्ला यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या प्रेमळ जोडप्याचा फोटो शेअर केला आहे. जिथे दोघे एकत्र बसलेले एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसतात. तसेच झनकनेही काही फोटो शेअर केले आहेत. ती फिटनेस ट्रेनर स्वप्नील सूर्यवंशीसोबत लग्न करणार आहे. “अखेर मी जाहीर करतेय की साखरपुडा झाला आहे,” असं कॅप्शन झनकने फोटोला दिलं आहे. झनकच्या या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karisma ka karishma fame child star jhanak shukla gets engaged to swapnil suryawanshi shares photos hrc
First published on: 09-01-2023 at 16:04 IST