ड्रामा क्वीन राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून पती आदिल खान दुर्राणीबरोबरच्या वादांमुळे सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात राखी सावंतला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रेटींचाही पाठिंबा मिळाला आहे. अशात आता प्रसिद्ध कॉमेडिय कृष्णा अभिषेकची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाहनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री कश्मीरा शाह सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. अशात कश्मीराचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती राखी सावंतचा पती आदिल खानवर भडकलेली दिसत आहे. तिने या व्हिडीओमधून राखी सावंतला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा- Video: “आदिल खान बायसेक्शुअल, त्याचा न्यूड व्हिडीओ…” राखी सावंतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “त्याच्या डोक्यावर केस…”

या व्हिडीओमध्ये कश्मीरा शाह राखी सावंतला पाठिंबा देताना दिसत आहे. तसेच तिचा पती आदिल खान दुर्राणीवर राग काढताना दिसत आहे. अभिनेत्रीने राखी सावंतच्या वादावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय, “जेव्हा राखी सावंतच्या आईचं निधन झालं तेव्हा मी तिला भेटू शकले नव्हते. कारण त्यावेळी मी अमेरिकेत होते. मी आदिलची बँड वाजवेन… त्याची हिंमत कशी झाली राखीबरोबर हे सर्व करण्याची?” कश्मीराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा- “माझ्यावेळीही त्यांनी…”, सिद्धार्थ शुक्लाच्या विजेतेपदाबद्दल ३ वर्षांनंतर आसिम रियाजचा खळबळजनक खुलासा

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्राणीबरोबर राखी सावंतचे वाद सुरू आहेत. राखीने आदिलवर लैंगिक शोषण आणि मारहाणीचे आरोप लावले आहे. त्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली आहे. या दरम्यान आदिल खानवर एका इराणी तरुणीने मैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashira shah reaction on rakhi sawant and adil khan controversy mrj
First published on: 26-02-2023 at 15:11 IST