मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून कविता लाड – मेढेकर यांना ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या उत्तमोत्तम नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेच सगळीकडे कौतुक होत आहे. दरम्यान एका मुलाखतीत कविता लाड यांनी सेटवर त्यांना मिळाणाऱ्या मानाबाबत भाष्य केलं आहे.

हेही वाचा- “मी एक नंबरचा व्यसनी, मला…”; मिलिंद गवळी यांचे विधान चर्चेत

कविता लाड म्हणाल्या, सेटवर मला खूप मान मिळतो. जर कुणी चांगली गोष्ट केली तर मी कौतुकही करते. पण जर वाईट झालं किंवा चुकलं तर मी तितक्याच अधिकाराने सांगते. तेवढा हक्क मला माझ्या सहकलाकारांनी आणि प्रोडक्शनने दिली आहे. एखाद्याच्या चूका असतील तर त्याला मी तेवढ्याच हक्काने सांगते. सगळेजण माझं ऐकून घेतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका शिक्षण मोठं की पैसा मोठा यावर भाष्य करणारी मालिका आहे. तसंच यामध्ये अक्षरा आणि अधिपतीची खूप सुंदर अशी प्रेम कथा दाखवण्यात येत आहे. या मालिकेत कविता लाड यांच्याबरोबर हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे आणि विजय गोखले यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.