अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती वेगवेगळ्या विषयांवरही आपली मत मांडताना दिसत असते. नुकतीच तिने दीप अमावस्येच्या निमित्तानं एक पोस्ट शेअर करून स्वतःची दंतकथा सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पोस्टबरोबर केतकीने काही फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये दीप पूजन केलेले दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री दिवे खाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेची संपूर्ण टीम सिद्धिविनायकाच्या चरणी, निमित्त होतं खास…

हे फोटो शेअर करत केतकीने लिहिले आहे की, “माझी दंत कथा, भाग ४: ३ दात काढले आहेत. बोलता येत नाहीये, नीट काही खाता येत नाहीये, मळमळ, वर्टीगो, सर्व चालू आहे त्या अँटिबायोटिक्समुळे. इलाज नाही कारण एपिलेप्सी औषधे व ही औषधे एकमेकांबरोबर क्लॅश होतात. पण, आज दीप पूजन म्हटल्यावर दिवे तर झालेच पाहिजेत. आगाऊपणा बघा, तोंड उघडता येत नसले तरी दिवे खायचे नाही, असे कसे… तुम्हा व तुमच्या परिवारास दिव्याच्या अवसेच्या शुभेच्छा.”

हेही वाचा – Video : “…अन् त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले”, क्रांती रेडकरनं सांगितला अनुभव

हेही वाचा – “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

दरम्यान काही दिवसांपूर्वी केतकीने तिच्या आयुष्यावर आधारित असलेले पुस्तक पुढच्या वर्षी प्रकाशित होणार असल्याचे जाहीर केले होते. या पुस्तकामधून तुरुंगात जायचा प्रवास आणि का? यामागची कारणं समोर येणार आहेत. मागच्या वर्षी तिला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे ४१ दिवसांच्या तुरुंगावास भोगावा लागला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale share post over deep amavasya 2023 pps
First published on: 17-07-2023 at 20:00 IST