मराठीतील लोकप्रिय अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. ते फेसबूकवर पोस्ट करून अभिनयक्षेत्र, राजकीय व सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देत असतात. आता त्यांनी एक पोस्ट केली आहे, या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण माने यांनी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत पोस्ट केली आहे. “छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा केला पण तो शत्रूविरूद्ध केला. त्यावेळचा समाज अज्ञानी, अशिक्षित असूनही शिवरायांनी त्यांचा गैरफायदा घेतला नाही. हल्ली आपल्याच माणसांच्या विरोधात गनिमी कावा करणाऱ्यांची सद्दी आहे. विशेष म्हणजे शिकले-सवरलेले लोक अशा भामट्यांची ‘अंधभक्ती’ करतात,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कॅन्सरशी झुंज अपयशी, समांतर सिनेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीला मुजुमदार यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘बरोबर याचं महत्वाचं कारण जर कोणतं असेल.. तर शिवरायांनी ती माणसं माझी आहेत असं समजून केलं होतं. तर आताचे हे सर्व गद्दार ही सगळी लोक माझ्यामुळे आहेत असं समजतात. हाच फरक शिवरायांच्या विचारात आणि यांच्यामध्ये आहेस,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘नक्कीच, शिवरायांनी गनिमीकावा स्वराज्याच्या शत्रुविरुद्ध केला, स्वतःच्या लोकांविरुद्ध नव्हे,’ असं एका युजरने म्हटलं आहे.