अभिनयविश्वात अनेक कलाकार काम करताना सह-कलाकाराच्या प्रेमात पडतात. काही जण तर लग्नही करतात. टीव्ही इंडस्ट्रीतही असं एक जोडपं आहे. एक अभिनेता मित्राच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. दोघांचे धर्म वेगळे होते, तसेच वयात ८ वर्षांचं अंतर होतं, तरीही या जोडप्याने लग्नगाठ बांधली. कोण आहेत हे दोघे? जाणून घेऊयात.
‘प्यार की ये एक कहानी’ ही मालिकाक २०१०-११ या काळात प्रसारित झाली होती. या मालिकेत आईची भूमिका किश्वर मर्चेंटने साकारली होती. या मालिकेत अभिनेता सुयश रायने किश्वरचा मुलगा विवियन डिसेनाच्या मित्राची भूमिका केली होती.
खऱ्या आयुष्यात किश्वर व सुयश यांच्या वयात ८ वर्षांचे अंतर आहे. किश्वर सुयशपेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे. या मालिकेतील दोघांचा अभिनय प्रेक्षकांना भावला होता. पण खऱ्या आयुष्यात हे दोघे प्रेमात पडतील अशी कल्पनाही कुणीच केली नव्हती. मालिकेत सुयशची काकू असलेली किश्वर पुढे त्याची पत्नी झाली.
९ वर्षांपूर्वी केलं लग्न
किश्वर व सुयश यांच्या वयात अंतर आहे. त्याचबरोबर दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. किश्वर मुस्लीम आहे, तर सुयश पंजाबी आहे. दोघांनी धर्माची पर्वा न करता लग्न केलं. खरं तर या लग्नाला सुयशच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्याचं कारण म्हणजे दोघांच्या वयातील अंतर. पण सुयशने मनधरणी केली आणि ते लग्नासाठी तयार झाले. अखेर सुयश व किश्वर यांनी २०१६ मध्ये लग्न केलं.
सुयश व किश्वर यांना वयातील अंतरामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण हे दोघेही नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करतात. या जोडप्याने २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांच्या मुलाचं नाव निरवैर आहे. सुयश व किश्वर मुलाला दोन्ही धर्माची शिकवण देतात.
किश्वर मर्चेंटबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘हिप हॉप हुर्रे’, ‘एक हसीना थी’, ‘इतना करो ना मुझे प्यार’, ‘हर मुश्किल का हल अकबर बीरबल’ व ‘कैसी ये यारियां या मालिकांमध्ये काम केलंय. तसेच तिने रिअॅलिटी शो, चित्रपट व वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.