सध्या टेलिव्हिजनविश्वात टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कमी टीआरपी अभावी बऱ्याच मालिका अचानक बंद करण्यात आल्या आहेत. अवघ्या तीन-पाच महिन्यात मालिका गुंडाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. येत्या काळात नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यापैकी एका नव्या कार्यक्रमाचा मुहूर्त ठरला आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ ( Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar ) हा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमासाठी ऑडिशन प्रक्रिया सुरू होती. पण, आता कार्यक्रमाची वेळ, तारीख ठरली आहे.

‘भक्तिरसात नाहून निघेल दुनिया सारी, कानावर पडता पांडुरंग हरी…’असं कॅप्शन देत ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कीर्तनात दंग झालेले पाहायला मिळत आहेत. १ एप्रिलपासून ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ सुरू होणार आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर रात्री ८ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

‘सोनी मराठी’च्या या नव्या कार्यक्रमाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतं आहे. अभिमानास्पद उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. ऋषिकेश बाळकृष्ण रिकामेने ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचं शीर्षकगीत गायलं आहे. तर हर्ष-विजय या जोडीने संगीतबद्ध केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार? परीक्षक कोण असणार? याची अद्याप घोषणा झालेली नाही. तसंच अजूनपर्यंत स्पर्धकांची नावंदेखील गुलदस्त्यात आहेत. पण, आता दमदार प्रोमो आणि शीर्षकगीतामुळे ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा नवा कार्यक्रम पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.