Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या नवीन ट्विस्ट आणि हटके कथानकामुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. नुकतीच मालिकेत अभिनेत्री रेवती लेलेची (अमृता) एन्ट्री झाली आहे. यशच्या बालमैत्रीणीची भूमिका ती साकारत आहे. तिच्या येण्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळं वळण आलं आहे.

मलिकेत काही दिवसांपासून यशचं कावेरीवर प्रेम असून तो तिला त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी संधीची वाट पाहत होता. मात्र त्याला ती संधी मिळालीच नाही, त्यात या दोघांच्या लव्हस्टोरीत अमृताच्या येण्याने नवा ट्विस्ट आला. माँने यश आणि अमृताच्या लग्नाच्या लग्नाचा निर्णय घेतला आहे. मालिकेच्या कथानकानुसार यश आणि अमृताच्या लग्नाबद्दल माँ कावेरीला सांगते. त्यामुळे ती तिच्या मनातील यशविषयीचं प्रेम विसरण्याचा निर्णय घेते.

त्यामुळे यश जेव्हा कावेरीला प्रेमाची मागणी घालतो, तेव्हा ती त्याला नकार देत, ‘तुम्ही फक्त माझे चांगले मित्र आहात’ असं म्हणते. मालिकेच्या नुकत्याच झालेल्या भागात विद्या कावेरीला तिचं यशवर प्रेम आहे की नाही? याबद्दल विचारते. तेव्हा कावेरी तिलाही स्पष्ट नकार देत असं काही नसल्याचं सांगते. पुढे माँ अमृताची ओटी भरत असताना नकळत ओटीचा नारळ खाली पडतो, मात्र तो नारळ कावेरी स्वत:च्या पदरात झेलते. त्यातर माँ तिला त्या नारळाने अमृताची ओटी भरण्यास सांगतात.

त्यानंतर विद्या यशला त्याचं कावेरीवर प्रेम आहे, मग तो तिला मदत का करत नाही असं विचारते. यावर यशसुद्धा त्याचं कावेरीवर प्रेम नसल्याचं सांगतो आणि हीच गोष्ट कावेरी ऐकते. यश आणि कावेरी या दोघांनी त्यांचं एकमेकांवरील प्रेम न स्वीकारण्याचं कारण म्हणजे गैरसमज आहे, दोघांच्या मनात दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे गैरसमज झालेत.

अशातच आता मालिकेत कावेरी हे घर सोडून जाणार आहे, याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात कावेरी चिकूला सोडून घरातून पळून जाणार आहे. कावेरीची एक प्रतिकृती तिला तू इथे येऊन यशसाठी अमृताच योग्य असल्याचे सांगते. तसंच तू तुझी कर्तव्य आठव आणि या घरातून निघून जा असं म्हणते. पुढे यश चिकूला (बहिणीचं बाळ) यशकडे ठेवून निघून जाते. मात्र कावेरी जाताच चिकूच्या जवळ नाग आल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिका प्रोमो

त्यामुळे आता कावेरीच्या मागे चिकूला काही होणार का? कावेरी खरंच यश आणि माँ यांना सोडून त्या घरातून कायमची निघून जाणार का? हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आज रात्री आठ वाजता हा भाग पाहता येणार आहे.