Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial Update : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसत आहे. मालिकेत एकामागून एक येणारे ट्विस्ट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत अमृता (रेवती लेले) या नवीन पात्राची एन्ट्री झाली. यशच्या बालमैत्रीणीची भूमिका ती साकारत आहे.

मालिकेत यशला कावेरीविषयी प्रेम वाटत होतं. तसंच कावेरीच्या मनातही यशबद्दल प्रेमभावना निर्माण झाली होती. दोघांची लव्हस्टोरी सुरू होणारच होती, मात्र या दोघांत अमृता आली आणि दोघांची लव्हस्टोरी सुरू होता होता राहिली.

त्यात माँने यश आणि अमृताच्या लग्नाच्या लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे कावेरी घर सोडून जाणार होती. मात्र घराच्या बाहेर पाऊल टाकणार इतक्यात चिकूवर मोठं संकट आलं होतं. त्यामुळे तिने घर सोडून जाण्याचा निर्णय मागे घेतला. अशातच आता पुन्हा माँ कावेरीला एका मोठ्या धर्मसंकटात टाकणार आहेत, ते म्हणजे यश-अमृताचं लग्न लावून देण्याचं वचन त्या कावेरीकडून घेणार आहेत.

मालिकेच्या आगामी कथानकाचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात माँ तिचा मोठा मुलगा उदयच्या परत येण्यासाठी कठीण व्रत करतात. या कठीण व्रतात त्यांना कावेरीची साथ मिळते. माँचं हे व्रत पूर्ण होऊ नये यासाठी अमृता विघ्न आणण्याचा प्रयत्न करते. मात्र माँला त्यांचं व्रत पूर्ण करण्यासाठी कावेरी मदत करते. यामुळे माँ कावेरीवर खुश होऊन तिचा सून स्वीकार करणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

कोण होतीस तू काय झालीस तू मालिका प्रोमो

याच प्रोमोमध्ये पुढे मोठा ट्विटस येतो, तो म्हणजे माँ कावेरीकडून वचन घेतात ते म्हणजे उदयला सुखरूप घरी परत आणणण्याचं आणि यश-अमृता याचं लग्न लावून देण्याचं. हे वचन पूर्ण करताच माँ कावेरीचा सून म्हणून स्वीकार करणार असल्याचं सांगतात. त्यामुळे आता कावेरी माँला उदयला सुखरूप घरी आणण्याचं तसंच यश-अमृता यांचं लग्न लावून देण्यासाठीचं वचन देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.