Ruhi Chaturvedi Announces Pregnancy : ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री रुही चतुर्वेदी लवकरच आई होणार आहे. श्रद्धा आर्या, सना सय्यद पाठोपाठ ‘कुंडली भाग्य’मधील तिसरी अभिनेत्री रुहीदेखील लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. तिने एक खास व्हिडीओ पोस्ट करून ही गुड न्यूज शेअर केली. रुहीने ‘कुंडली भाग्य’मध्ये शर्लिन खुराना मल्होत्रा नावाचे पात्र साकारले होते.

रुही चतुर्वेदी लग्नानंतर पाच वर्षांनी आई होणार आहे. रुहीने शिवेंद्र सैनीयोलशी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. ३१ वर्षीय रुहीने आज (११ नोव्हेंबरला) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि ती गरोदर असल्याची माहिती चाहत्यांना दिली. ‘आमचं सुंदर कुटुंब थोडं मोठं होत आहे’, असं कॅप्शन रुहीने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

रुहीने स्विमींग पूलजवळचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिचा बेबी बंप फ्लाँट करते व शिवेंद्र तिच्या बेबी बंपला किस करताना दिसतो.

पाहा व्हिडीओ –

रुहीने हा व्हिडीओ शेअर केल्यावर चाहते तिचं व शिवेंद्रचं अभिनंदन करत आहेत. श्रद्धा आर्यानेदेखील यावर कमेंट केली आहे. ‘इंटरनेटवरील आजरी सर्वात चांगली बातमी, नवीन आई-बाबांना खूप सारं प्रेम,’ असं श्रद्धाने लिहिलं. शक्ती अरोरा, स्वाती कपूर, सुप्रिया शुक्ला व पूजा बॅनर्जी यांनी कमेंट्स करून शिवेंद्र व रुहीला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ठरलं तर मग : अखेर मधुभाऊंची जेलमधून होणार सुटका! अर्जुनने कोर्टात घेतली मोठी जबाबदारी, पाहा प्रोमो

रुहीआधी आर्या व सनाने दिली गुड न्यूज

रुही चतुर्वेदी ही ‘कुंडली भाग्य’मधील तिसरी अभिनेत्री आहे जी लवकरच आई होणार आहे. तिच्याआधी श्रद्धा आर्या व सना सय्यद यांनी त्या आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. श्रद्धाच्या प्रसूतीला अद्याप वेळ आहे. तर सनाला ९ ऑक्टोबर रोजी मुलगी झाली.

हेही वाचा : Suraj Chavan – सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी! काय आहे कारण? अंकिता व जान्हवी यांचा उल्लेख करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुही चतुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मांगल्य भाग्यम, आलाप, कंगना, पगली, लव्ह यू टर्न आणि कुंडली भाग्य या मालिकेसाठी ओळखली जाते. तिने २०१९ मध्ये शिवेंद्रशी लग्न केलं होतं. हे जोडपं लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.