झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल सध्या लंडन दौऱ्यावर आहे. खास पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली होती. तसेच त्याने एक किस्साही सांगितला. त्याची ही पोस्ट पाहून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुले यांनी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

कुशलने त्याच्या बालपणाचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. १२०/३०० कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस. लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे ‘मी’ देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला “साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना…देस बिदेस घुमेगा!” लहानपणी, कन्नी कापलेल्या पतंगा मागे ‘उरफाटेस्तोवर’ धावणाऱ्या मला माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे ‘उरफाटेस्तोवर’ धावायला लावलं नाही. झाडाला ‘व्हलटा’ (छोटी काठी) मारून हवी असलेली ‘कैरी’ पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही, हवी असलेली ‘स्वप्न’ पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही”.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जे जसं होत गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून प्रामाणिकपणाची शिदोरी तेवढी मिळाली होती ती मात्र या प्रवासात कामी आली. अजूनही येते. माझ्या आई-बाबांनी, अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करुन घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही. म्हणून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालो आहे. आज पुन्हा मी लंडनच्या प्रवासाला निघालो आहे. नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलं आहे मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या १२०/३०० पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की”.

कुशलचा हा प्रवास पाहून समीर यांना त्याचा अभिमान वाटला. ते म्हणाले, “कुशल तू प्रामाणिक मेहनत, चिकाटीमुळे आजपर्यंत इथवर मजल मारली आहेस. तू आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणांसाठी पात्र आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम भावा”, समीर यांच्या या कमेंटनंतर “दादा” असं कुशलने त्यांना म्हटलं आहे.